गोरखपुर, 5 फेब्रुवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अनैतिक संबंध, बलात्कार तसेच आत्महत्या आणि हत्येच्या घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच परिवारातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
यूपीच्या गोरखपूरमध्ये तरुणाच्या या भयंकर कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीसह दोन मुलांची हत्या करून तरुणाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. घरातून 4 जणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलहातून तरुणाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केले असण्याची शक्यता प्राथमिक तपासात वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली.
हे प्रकरण गोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवकली गावातील आहे, याठिकाणी भाजी विक्रेता, त्याची पत्नी आणि दोन मुलांचा शनिवारी रात्री उशिरा जळून मृत्यू झाला. रविवारी सकाळी खोलीतून धूर येत असल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी आत जाऊन पाहिले असता चौघांचेही मृतदेह एकाच बेडवर पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंततर पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. कौटुंबिक कलहातून ही घटना घडली असल्याची चर्चा गावात आहे.
हेही वाचा - 6 हजारांच्या वादातून बायकोचे नियंत्रण सुटले, नवऱ्यासोबत केलं भयानक कांड
गावातील इंद्र बहादूर मौर्य हा भाजीपाला विकायचा. त्याचे पत्नीसोबत वारंवार वाद होत होते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. रविवारी सकाळी त्यांच्या घरातून धूर निघत होता. आजूबाजूच्या लोकांनी गेट तोडून पाहिले असता, एकाच बेडवर इंद्र बहादूर, पत्नी सुशीला देवी, मुलगी चांदनी आणि मुलगा आर्यन यांचे जळालेले मृतदेह पडले होते. महिलेच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमेच्या खुणा आढळल्या. पत्नी आणि मुलींच्या हत्येनंतर पतीनेच घर पेटवून दिल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Death, Murder, Uttar pardesh