जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Shocking! थट्टा-मस्करीत पतीचं लिंग परिवर्तन, पत्नीचीही साथ; आता दोघांचही आयुष्य उद्ध्वस्त

Shocking! थट्टा-मस्करीत पतीचं लिंग परिवर्तन, पत्नीचीही साथ; आता दोघांचही आयुष्य उद्ध्वस्त

Shocking! थट्टा-मस्करीत पतीचं लिंग परिवर्तन, पत्नीचीही साथ; आता दोघांचही आयुष्य उद्ध्वस्त

पत्नी पतीला मुलींसारखं तयार करायची आणि सोबत बाजारात घेऊन जात होती. धक्कादायक म्हणजे तिनेच पतीला लिंग परिवर्तन करण्यास सांगितलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 5 मार्च : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) भोपाळमध्ये एक सीनिअर एडव्होकेट आणि काऊन्सलरकडे हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. ही कहाणी एका दाम्पत्याची आहे. दोघांमध्ये महाविद्यालयीन काळापासून प्रेम होतं. यानंतर दोघांनी पळून लग्न केलं. दोघेही दिल्लीत चांगली नोकरीही करतात. दोघांचं आयुष्य मस्त सुरू होतं. मात्र अचानक कहाणीत ट्विस्ट आला. एकेदिवशी पत्नीने थट्टा मस्करीने पतीला लिंग (husband changed gender for wife) बदलण्यास सांगितलं. यानंतर पतीदेखील यास तयार झाला. पत्नी त्याला मुलींसारखं तयार करून मार्केटमध्येही नेऊ लागली. एक वर्ष सुरू असलेल्या शस्त्रक्रियेनंतर पती पूर्णपणे मुलगी झाला. हेच दोघांमधील वादाचं कारण ठरलं. आता प्रकरण घटस्फोटापर्यंत आलं आहे. पतीने लिंग परिवर्तन केल्याच्या कारणामुळे पत्नीने घटस्फोटाची मागणी केली आहे. पत्नी म्हणते, तू मला मुलं आणि दाम्पत्य सुख देऊ शकत नाहीस, त्यामुळे तू माझ्या काही कामाचा नाही. भोपाळची काऊंन्सिलर सरिता राजानी 8 महिन्यांपासून या दाम्पत्याचं समुपदेशर करीत आहे. तरुणाच्या आई-वडिलांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि मुलाचा संसार वाचवण्यासाठी मदत मागितली. काऊन्सिलर सरिताने सांगितलं की, थट्टा-मस्करीत उचललेल्या या पावलामुळे दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. कोणत्याही हार्मोनल लक्षणांशिवाय लिंग परिवर्तन करणं एका सुखी कुटुंबासाठी वेदनादायी ठरलं आहे. आता मात्र पत्नी काहीही ऐकण्यास तयार नाही आणि पतीसोबत राहणार नसल्याचं सांगते. मात्र पतीला तिच्यासोबत राहायचं आहे. पत्नी स्वत: पतीला तयार करीत होती आणि… लिंग परिवर्तनाची प्रक्रिया वर्षभरापर्यंत सुरू होती. उपचार सुरू झाले तेव्हा तरुणाचं वय 25 वर्षे असेल आणि त्याची पत्नी 23-24 वर्षांची. सुरुवातीच्या प्रोसेसमध्ये डॉक्टरांकडून काही महिने हार्मोनल चेंजेसशी संबंधित औषधं खाण्यासाठी देण्यात आली. काही महिने थेरेपी सुरू राहिली आणि शेवटी सर्जरी करण्यात आली. हार्मोनलची औषध खाल्ल्यानंतर साहिलला शरीरातील बदल जाणवत होता. पती-पत्नी लिंग परिवर्तनाची प्रक्रिया एन्जॉय करीत होते. पत्नी पतीला स्वत:चे कपडे घालायला देत होती आणि स्वत: मुलींप्रमाणे त्याला तयार करीत असे. ती त्याला मार्केटमध्ये जाताना सोबत घेऊन जात होती. काही महिने असच सुरू होतं. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तरुण पूर्णपणे मुलगी झाला. सुरुवातील या सर्वात दोघेही आनंदी होते. मात्र दोघांनीही याच्या परिणामांचा विचारही केला नाही. हे ही वाचा- पहिली पत्नी सोडून गेली, दुसऱ्या लग्नाच्या 30 दिवसात नवविवाहितेची हत्या दोन्ही कुटुंबातून त्यांना भेटण्यासाठी बोलवलं जात होतं, मात्र काही कारण सांगून दोघाेही आपआपल्या कुटुंबाला टाळत राहिले. अशात दीड वर्षे निघून गेली. काही दिवसांपूर्वी तरुणाचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी घरी पोहोचले. मुलाला अशा रुपात पाहून दोघांनाही धक्काच बसला. त्यांनी पत्नीलाच यासाठी जबाबदार धरलं. यामुळे नाराज तरुणी आपल्या माहेरी निघून गेली. दुसरीकडे तरुण पत्नीला घरी आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र तिने परत येण्यास नकार दिला. या सर्व प्रकरणाला 4 वर्षे लोटली. आता पत्नी लिंग परिवर्तन केलेल्या पतीसोबत राहू इच्छित नाही. तिला मुल हवं असल्याचं म्हणते. जर पती दाम्पत्य सुख देऊ शकत नाही, मुल देऊ शकत नसेल तर ती सोबत राहणार नसल्याचं म्हणते. आणि पत्नीने आता घटस्फोटाची मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात