जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / हनिमूनसाठी खोलीत गेलेल्या पती-पत्नीचा सकाळी सापडला मृतदेह, धक्कादायक कारण आलं समोर

हनिमूनसाठी खोलीत गेलेल्या पती-पत्नीचा सकाळी सापडला मृतदेह, धक्कादायक कारण आलं समोर

हनिमूनसाठी खोलीत गेलेल्या पती-पत्नीचा सकाळी सापडला मृतदेह, धक्कादायक कारण आलं समोर

घडलेल्या घडनेनं संपूर्ण गावात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 2 जून : भारतातल्या अनेक राज्यांमध्ये गुन्हेगारी खूप आहे. त्यातही उत्तर प्रदेशचा क्रमांक वरचा आहे. उत्तर प्रदेशातल्या बहराइचमध्ये नुकतीच एक विचित्र घटना घडली. लग्नाच्या दुसऱ्याच रात्री नवपरिणित दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या खोलीत त्यांचे मृतदेह आढळून आले. पोलीस या संदर्भात पुढचा तपास करत आहेत. उत्तर प्रदेशातल्या बहराइचला ही घटना घडली. लग्नाच्या दुसऱ्याच रात्री नवरा-बायकोचा मृत्यू झाल्याची ही आश्चर्यकारक घटना आहे. केसरगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोडहिया नंबर 4 इथं राहणाऱ्या प्रताप याचं लग्न गोडहिया नंबर 3 इथल्या गुल्लनपुरवा गावातल्या पुष्पा हिच्याशी ठरलं होतं. 30 मे रोजी त्यांचं लग्न झालं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 मे रोजी वरात घरी आली. रात्री उशिरा नवपरिणित दाम्पत्य आपल्या खोलीत गेलं; पण ती दोघंही सकाळी उठलीच नाहीत. गुरुवारी (1 जून) सकाळी खोलीचा दरवाजा उघडला नाही, म्हणून कुटुंबातले सगळे जण घाबरले. सगळ्यांनी मिळून कसाबसा खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा ते दोघंही निपचित पडलेले आढळले. त्यांचा मृत्यू झाल्याचं नंतर स्पष्ट आलं. मुलाकडच्या व्यक्तींनी मुलीकडच्यांना कळवलं व बोलावून घेतलं. घडलेल्या घडनेनं संपूर्ण गावात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. प्रताप आणि पुष्पा या दोघांचा अशा तऱ्हेने गूढ मृत्यू झाल्यानं दोन्ही कुटुंबीय शोकाकूल आहेत. या मृत्यूमागचं गूढ उलगडलेलं नसतानाही कुटुंबीयांनी मात्र सुरुवातीला शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर कुटुंबीय तयार झाले. आता दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच खरं कारण समोर येऊ शकतं. Solapur crime news : आयुष्यभराची साथ देण्याऐवजी बायकोच्याच जीवावर उठला पती, पुढे जे घडलं त्यानं सोलापूर हादरलं घरातल्या ज्या खोलीमध्ये मृतदेह होते, तिथे जवळच उलटी झाल्याचंही दिसत होतं, असं अपर पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानजय सिंह यांनी सांगितलं आहे. उलटी झाल्याचं आढळल्याने प्राथमिकदृष्ट्या हा अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आता शवविच्छेदन अहवालाच्या आधारावर पुढची कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलंय. बहराइच गावात या घटनेमुळे खळबळ माजली आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पती-पत्नीचा मृत्यू झाल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नवदाम्पत्याशी कोणाचं वैर होतं का किंवा इतर कोणत्या पूर्ववैमनस्यातून हे करण्यात आलंय, याचा शोध पोलीस घेत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूमागचं नेमकं कारण स्पष्ट होईल. त्यानुसार पोलीस कारवाई करतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात