सोलापूर : आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांसोबत राहण्याचं वचन निभावता निभावता एकमेकांच्या जीवावर उठले. पतीने पत्नीची गळा कापून हत्या केली. या हत्येनंतर स्वत:चं आयुष्यही संपवलं आहे. या घटनेमुळे सोलापुरात मोठी खळबळ उडाली. जिल्ह्यातील मंद्रूप इथे हा धक्कादायक प्रकार घडला. पतीने पत्नीची सत्तूरने गळा कापून केली हत्या, पतीने केली गळफास घेऊन आत्महत्या, कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीचा सत्तुरने गळा कापून खून केला केला. पतीने पत्नीच्या गळ्यावर वार केले.
बापाने लेकीला 25 वेळा सुऱ्याने भोसकलं, पत्नीही जखमी; दिल्लीनंतर आणखी एक भयानक Videoघराशेजारी असणाऱ्या झाडाच्या फांदीला पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लाडलेसब हुसेनी नदाफ (वय वर्षे 65) असे पत्नीची हत्या करणार्या पतीचे नांव असून.
Delhi Murder Case : पीडितेची फुटलेली कवटी, 34 जखमा अन् नवं CCTV फुटेज, दिल्ली हत्या प्रकरणातील आतापर्यंतचे अपडेटनगुमा लाडलेसब नदाफ (वय वर्षे 63) असे मृत पत्नीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अधिक तपास मंद्रूप पोलीस करीत आहे.