लंडन, 22 ऑगस्ट : श्वानाला तुम्ही त्याच्याच शेपटीशी खेळताना पाहिलं असेल. पण कधी कोणत्या श्वानाने स्वतःचीच शेपटी खाल्ल्याचं तुम्ही ऐकलं आहे. असंच धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका श्वानाने स्वतःचीच शेपटी खाल्ली आहे आणि त्यातही धक्कादाक म्हणजे त्यासाठी त्याच्या मालकाला अटक करण्यात आली. आता श्वानाने शेपटी खाण्यात त्याच्या मालकाचा काय गुन्हा? त्याला का तुरुंगवास झाला? याचं तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल.
यूकेच्या चेशायरमधील ही घटना आहे. एका महिलेने विपेट-लर्चर जातीचा कुत्रा पाळला. ज्याचं नाव पॉपी. पण पॉपी आता एलसॅगर एनिल्स इन नीड या डॉग केअर सेंटरमध्ये आहे. तर त्याची मालक तुरुंगात. काही महिन्यांपूर्वी जेव्हा पॉपीला या सेंटरमध्ये आणण्यात आलं तेव्हा त्याची अवस्था खूप भयंकर होती. तो जवळजवळ मरण्याच्या दारातच होता.
पॉपीची मालकिण त्याची बिलकुल काळजी घ्यायची नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. पॉपीला ती खायलाही द्यायची नाही. त्यामुळे त्याची तब्येत बिघडत गेली. तो इतका बारीक झाला की त्याची हाडं दिसू लागली. तो हाडांचा सापळा बनला.
हे वाचा - Video : कुत्रा आहे की रॉकेट? बॉल पकडण्यासाठी मारलेली हाय-जम्प पाहून भले-भले चक्रावले!
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार असिस्टंट अॅनिमल कोऑर्डिनेटर लीसा विलियम्स यांनी सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी जेव्हा त्याला उपचारासाठी आणण्यात आलं तेव्हा तो आपल्या पायांवर नीट उभाही राहू शकत नव्हता. त्याचे पाय वाकडे झाले होते. शरीरात फॅट खूप कमी होतं. थंडी जास्त असल्याने त्याला लॅम्पजवळ ठेवावं लागलंत. त्याच्या कानाचे पडदे खराब झाले होते. मणक्याच्या हाडात आणि शरीराच्या काही अवयवात पू झाला होता, शेपटी कापलेली होती.
कुत्र्याची शेपटी अशा पद्धतीने कापलेली आहे, जशी ती त्यानेच खाल्ली काहीच खायला मिळत नसल्याने आपली भूक भागवण्यासाठी या भुकेल्या कुत्र्याने आपली शेपटी खाल्ली.असा दावा डॉग केअर सेंटरने केला आहे.
हे वाचा - तोंडात धरला हात आणि काही सेकंदातच व्यक्ती...; सापाच्या हल्ल्याचा भयानक VIDEO VIRAL
काही महिन्यांपूर्वी त्याला ओळखणंही अशक्य झालं होतं. पण आता तो हळूहळू बरा होऊ लागला आहे. बऱ्याच महिन्यांनी तो रिकव्हर झाला आहे. त्याच्या मालकिणीला जेलमध्ये पाठवलं आणि तिच्यावर प्राणी पाळण्यास 3 वर्षे बंदी घालण्यात आली आहे. पॉपीसाठी नव्या मालकाचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Pet animal, World news