जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Human Trafficking : मानवी तस्करी प्रकरण रेल्वे पोलिसांच्या अंगलट येणार? 'त्या' मुलांचे पालक थेट भुसावळमध्ये

Human Trafficking : मानवी तस्करी प्रकरण रेल्वे पोलिसांच्या अंगलट येणार? 'त्या' मुलांचे पालक थेट भुसावळमध्ये

मानवी तस्करी प्रकरण

मानवी तस्करी प्रकरण

Human Trafficking Case : बिहार येथून आलेल्या रेल्वेमध्ये 59 मुलांची मानवी तस्करी केली जात असल्याचा आरोप करत या मुलांवर कारवाई केली होती. मात्र, हे प्रकरण आता रेल्वे पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी जळगाव, 2 जून : चार दिवसांपूर्वी बिहार येथून आलेल्या रेल्वेमध्ये 59 मुलांची मानवी तस्करी केली जात आहे. या आरोपावरुन भुसावळच्या रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशन यांनी मनमाड व भुसावळ येथे 59 मुलांना गाडीखाली उतरवून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. या मुलांना बाल सुधार गृहात पाठविले तर मौलवींच्या विरुद्ध थेट मानवी तस्करी केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले. ही बाब बिहार स्थित मुलांच्या आई-वडिलांना कळली असता त्यांनी थेट भुसावळ शहर गाठले असून त्यांनी या प्रकरणी रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. भुसावळ व मनमाड येथे आरपीएफ व लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत अन्यायकारक आहे. मुलांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप मौलवींवर लावण्यात आला आहे. या मुलांकडे आधार कार्ड आरक्षित तिकीट असताना त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली गेली. या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन आता बाल सुधार गृहात जाऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करत या मुलांना ताब्यात घेऊन त्यांना पुन्हा सांगली, कराड व कोल्हापूर येथे पुढील शिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. वाचा - वर्षभरापूर्वी लग्न, पण पतीचं भयानक रुप आलं समोर, तुम्हालाही बसेल धक्का! आम्ही आमच्या मुलांना मौलवींच्या माध्यमातून दरवर्षी रीतसर रेल्वेचे आरक्षण करून आधार कार्ड देऊन त्यांना महाराष्ट्रातल्या सांगली येथे अरबी शिक्षणासाठी पाठवत असतो. कारण आमची मुलं घरी हवे तसे शिक्षण घेत नाहीत. म्हणून आम्ही त्यांना पाठवत असतो. परंतु, भुसावळ पोलिसांचे हे षडयंत्र असून आमच्या मौलवींना त्यांनी अटक केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोपही लावलेले आहेत. तशी कुठलीही कुणाची तक्रार नाही. आमच्या मौलवींचा मोबाईल  काढुन घेतला आहे.त्यांना कुणाशी बोलू दिले नाही. पालकांना कल्पना न देता मुलांना अटक केली हे चुकीचे आहे.या सर्व घटने  विरुद्ध आम्ही दाद मागणार आहोत. बिहारच्या गौरव या दुर्गम भागातून आलेल्या रुकसाना खातून या महिलेने सांगितले की आमची घरची परिस्थिती नाजूक आहे. आम्ही स्वतः मोलमजुरी करतो व कसातरी उदरनिर्वाह करत असतो. आमच्या मुलांनी महाराष्ट्रात जाऊन अरबी शिक्षण घ्यावे, अशी आमची इच्छा आहे. परंतु, सर्व कागदपत्र असताना देखील आमच्या मुलांना व आमच्या मौलवींना गुन्हेगार ठरवलेले आहे. आता देखील आम्ही कर्ज काढून भुसावळपर्यंत आलो आहे ते आमच्या लेकरांसाठी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , jalgaon
  • First Published :
जाहिरात
जाहिरात