ग्वालियर, 11 ऑगस्ट : दुसऱ्या जातीतल्या तरुणावर प्रेम करून त्याच्याशी लग्न केल्याच्या (inter cast marriage) रागातून वडिल, भाऊ आणि चुलत्यांनी (Father, brother and uncle) तरुणीचा खून (hanged to death) केल्याचं उघड झालं आहे. लग्नानंतर माहेरी आलेल्या तरुणीला फाशी देऊन या तिघांनी मारून टाकलं. वडिलांनी तिचे हात पकडले, तर भाऊ आणि काकांनी तिच्या गळ्यात फाशीचा फंदा अडकवून तिला फासावर लटकवलं. ऑनर किलिंगच्या या घटनेनं देशाला धक्का बसला आहे.
अशी घडली घटना
मध्यप्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यातल्या जनकगंजमध्ये राखी राठोड या 20 वर्षांच्या तरुणीनं फाशी घेतल्याच्या बातमीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांना या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. राखीच्या गळ्यात असणारा फासाची गाठ ही वेगळ्या पदधतीने बांधण्यात आली होती. स्वतः फाशी घेणारी व्यक्ती अगोदर फंदा तयार करते आणि त्यात आपली मान घातले. राखीच्या गळ्याभोवती मात्र फाशीचा फंदा अगोदर गुंडाळला गेला आणि नंतर त्याला गाठ मारली गेल्याचं दिसून आलं, अशी बातमी 'दैनिक भास्कर'नं दिली आहे.
शिवाय ज्या ठिकाणी साडी बांधून ही फाशी घेण्यात आली, ती जागा खूपच उंचावर असल्याचं पोलिसांना जाणवलं. इतक्या उंचीवर राखीचा हात सहसा पोहोचणार नसल्याचं गृहित धरून दुसऱ्या कुणीतरी या जागी साडी लटकवली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी राखीचा भाऊ जितेंद्र आणि वडिल राजेंद्र यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी आपणच तिचा खून केल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली.
आंतरजातीय विवाह
राखीचं दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम होतं. 5 जूनला घरातील काही पैसे आणि दागिने घेऊन पळून जाऊन तिनं त्या मुलासोबत लग्न केलं होतं. माहेरच्यांना घाबरत घाबरत दोन महिन्यांनंतर ती माहेरी आली होती. मात्र घरच्यांचा राग शांत झाला नव्हता. मुलगी घरी आल्याची संधी साधत तिघांनी तिला फासावर लटकवून तिची हत्या केली. धक्कादायक म्हणजे क्राईमवर आधारित टीव्ही मालिका पाहून आपण ही योजना आखल्याचं तिघांनी सांगितलं.
हे वाचा -बापरे! पोटातून 18 कोटींची कोकेन तस्करी; मुंबई विमानतळावरून दोघांना अटक
आरोपी फरार
राखीचे वडिल, भाऊ आणि काका यांनी आपले आरोप कबूल केले असले, तरी सध्या ते फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.