यूक्रेन, 26 सप्टेंबर : रशिया-युक्रेनच्या युद्धाला जवळपास एक वर्षाहून जास्त काळ झाला आहे. मात्र, तरी दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांना पराभूत करण्यात गुंतले आहे. यातच एक भयानक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो युक्रेनच्या सैनिकाचा आहे. हा सैनिक रशियाच्या कैदेतून परतला आहे. या सैनिकाचे कैदेत जाण्यापूर्वीचे आणि सुटकेनंतरचे दोन्ही फोटो व्हायरल होत आहेत. या सैनिकाचे नाव मिखाइलो डायनोव असे आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला सर्वांना नक्कीच धक्का बसणार आहे. युक्रेनियन सैनिक मिखाइलो डायनोव्हचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रशियन सैन्याने त्याला अटक करण्यापूर्वी तो किती देखणा होता हे या फोटोवरुन दिसत आहे. मात्र, सुटका झाल्यानंतर या जवानाची ओळख पटवणेही कठीण झाली आहे. मिखाइलोची फक्त हाडे दिसत आहेत. रशियाच्या कैदेत असताना इतकी भयानक त्याची अवस्था झाली आहे. त्याच्या अंगावर जखमा आहेत तर त्याच्या डोळ्यांमध्ये पूर्वीसारखी चमकही दिसत नाहीए. मारियुपोल याठिकाणी झाली अटक - रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, मिखाइलो डायनोव्हला रशियन सैन्याने युक्रेनमधील दक्षिण-पूर्व शहर मारियुपोलमधून पकडले होते. त्याला अज़ोवस्टल स्टील वर्क्सचे संरक्षण करताना दरम्यान अटक करण्यात आली होती. यानंतर बुधवारी त्याची सुटका करण्यात आली आहे. टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार. कुख्यात रशियन तुरुंगांच्या छावण्यांमध्ये मिखाइलो डायनोव्हला चार महिने भयानक छळ सहन करावा लागला.
The first photo show Mykhailo Dianov during the epic battle in AzovStal plant. You can see on the second photo how he looks like after release from Russian captivity. I’ll remind that 3 Geneve convention oblige Russia to provide medical assistance and ensure human attitude to POW pic.twitter.com/Jt90fsRGBQ
— Oleksandra Matviichuk (@avalaina) September 23, 2022
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या युक्रेनियन सैनिकाच्या या फोटोत तो फारच कमकुवत दिसत आहे. मिखाइलो डायनोव्हची नवीन फोटो हे भीतीदायक आहे. या फोटोत त्याच्या हातावर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणा दिसत आहेत. मिखाइलो डायनोव्ह यांना कीव मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहितीही काही माध्यमांनी दिली आहे. हेही वाचा - रशिया आणि युक्रेनमध्ये महत्त्वाचा करार, ‘या’ निर्णयामुळे भारताला कसा होईल फायदा? रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये गेले काही महिने सुरू असलेलं युद्ध अद्याप काही संपण्याचं नाव घेत नाहीये. या युद्धामुळे त्या दोन देशांवर तर परिणाम झालेच; पण साऱ्या जगावरही दुष्परिणाम झाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमध्ये तत्काळ युद्धविराम करण्याचं आणि संकट सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्य मार्गावर परत येण्याचं आवाहन केलं आहे.