भोपाळ, 11 मार्च : उज्जैनमध्ये (Madhya Pradesh News) एका गरीब कुुटुंबातील तरुणाच्या बँक खात्यात आलेल्या पैशांची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. राहुल मालवीय नावाच्या तरुणाच्या बँक अकाऊंटमध्ये तीन महिन्याच्या आत 5 कोटी रुपये आले आणि ते पैसे काढून देखील घेतली. हे पैसे एटीएम आणि चेकच्या माध्यमातून काढले (Bank Fraud) जात होते. यासाठी राहुलला दर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये मिळत होते. राहुलने याच पैशांमधून तब्बल 25 लाखांचं घर खरेदी केलं होतं. जेव्हा बँकेने राहुलच्या अकाऊंटमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या लाखो रुपयांवरुन रोखलं तर राहुल घाबरला आणि पोलिसांकडे मदतीसाठी पोहोचला. मात्र पोलिसांनीही राहुलकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. यानंतर ज्या लोकांकडून पैसे ट्रान्सफर केले जात होते, ते उज्जैनला आले आणि पोलिसांच्या मदतीने राहुलचं घर स्वत:च्या नावावर केलं. राहुलने पोलिसांच्या कामावरुन मुख्यमंत्री हेल्पलाइनवर तक्रार केली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करीत पोलीस अधिक्षकांना एका कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. हे ही वाचा- 7 दिवसांच्या बाळाला गोळ्या घालून छिन्नविछिन्न केलं; सख्ख्या बापाचच क्रूर कृत्य या प्रकरणात राहुलने पोलिसांना सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी छत्तीसगडच्या सत्यप्रकाश नावाच्या व्यक्ती त्याला चहाच्या दुकानावर भेटली होती. त्यांनी राहुलला इंदूरमधील काही लोकांची भेट घालून दिली. आणि सोशल मीडियावर फनी व्हिडीओ टाकण्याचं काम दिलं. 7 दिवसांपर्यंत इंदूरमध्ये ठेवून या कामाचं ट्रेनिंग दिलं. यानंतर राहुलचे बँक अकाऊंट उघडण्यात आलं आणि त्या खात्यात एटीएम चेक बुक स्वत:कडे ठेवण्यात आलं. सध्या एसपी या प्रकरणात तपास करीत आहेत. पोलिसांकडून राहुलच्या खात्या येणाऱ्या पैशांचाही तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.