राहुल कौशिक (भीलवाडा), 11 मार्च : मागच्या आठडवड्यात म्हणजे 4 मार्चची गोष्ट आहे. सरकारी शाळेतील एका शिक्षकाला एका महिलेचा फोन येतो. तुम्हाला जागा घ्यायची आहे का? हवी असेल तर सांगा आम्ही तुम्हाला चांगली जागा मिळवून देतो असा फोन आला होता. दरम्यान यावरून जेव्हा तो शिक्षक संबंधिताच्या घरी जातो. या दरम्यान चर्चेवेळी अचानक पाणी पिल्यानंतर या शिक्षकाला चक्कर येऊन खाली पडतो.
यावेळी शिक्षकाचे कपडे काढून अश्लील फोटो काढले जातात. तसेच एका महिलेसोबत त्या शिक्षकाचे व्हिडिओ बनवला जातो. काही वेळाने त्या शिक्षकाला जाग आल्यानंतर ब्लॅकमेलिंग करण्यास सुरू होते. दरम्यान शिक्षकाकडे पैशाची मागणी होते. यावेळी त्याच्या बँक खात्यातून 1 लाख 10 हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली जाते.
बायको घरी अन् प्रेयसीला भेटायला गेला 3 लेकारांचा बाप, गावकऱ्यांनी पाहिलं आणि असं काही केलं की..ही घटना राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्याच्या शाळेतील शिक्षक भैरूलाल जाट यांच्याबाबतीत घडली आहे. यांनी हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला, यावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला, यावर शिक्षक जाट म्हणाले की, आम्ही तुला ब्लॅकमेल केलो आहे याबाबत पोलिसांना माहिती दिला तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकीही त्या शिक्षकास देण्यात आली होती. सुभाष नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी नंदलाल रिनवा यांनी सांगितले की, गुन्हा दाखल होताच तपास सुरू करण्यात आला असून जाट यांची तक्रार योग्य असल्याचे आढळून आले आहे.
प्राथमिक तपास करत असताना, पोलिसांनी बँक खाते तपशील, वैद्यकीय तपासणी आणि तक्रारदार आणि आरोपीची घटनास्थळ तपासणीच्या आधारे या घटनेत सहभागी असलेल्या 3 महिलांसह 5 जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक पती-पत्नी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी मुकेश सैन आणि त्याची पत्नी माया उर्फ पूजा, मनोज, मीना उर्फ मैना राव आणि कृष्णा शर्मा यांना अटक केली आहे.
यापूर्वीही या टोळीने लोकांना सापळा रचून लाखो रुपये उकळल्याचे माहिती समोर आली आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी डझनहून अधिक हनी ट्रॅपच्या घटना केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी काही वकिलांची नावे सांगून प्रकरणे दाबत पैसै उकळल्याचे आढळले आहे.