Home /News /crime /

इम्रानच्या पाकिस्तानात सुरक्षित नाहीत अल्पसंख्यांक! हिंदू पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या

इम्रानच्या पाकिस्तानात सुरक्षित नाहीत अल्पसंख्यांक! हिंदू पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या

पत्रकार केस कापण्यासाठी गेला असता त्याची हत्या (Hindu Reporter Shot Dead in Pakistan) करण्यात आली. दोन दुचाकी आणि एका कारमध्ये आलेल्या काही लोकांनी अजयवर गोळीबार करुन त्याची हत्या केली

    कराची 21 मार्च : पाकिस्तानच्या सिंध येथे एक हिंदू पत्रकार अजय लालवानी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पत्रकार केस कापण्यासाठी गेला असता त्याची हत्या (Hindu Reporter Shot Dead in Pakistan) करण्यात आली. दोन दुचाकी आणि एका कारमध्ये आलेल्या काही लोकांनी अजयवर गोळीबार करुन त्याची हत्या केली. अजय लालवानी एक लोकल न्यूज चॅनेल आणि उर्दू भाषातेली वृत्तपत्र 'डेली पुचानो'मध्ये पत्रकाराचं काम करत होते. अजय हे गुरुवारी सुक्कुर शहरात आपले केस कापण्यासाठी दुकानात गेले होते. तिथेच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. जखमी अवस्थेतील लालवानी यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, बऱ्याच गोळ्या लागल्या असल्यानं त्यांचा मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, अजय लालवानी यांचे वडील दिलीप कुमार यांचं असं म्हणणं आहे, की त्यांच्या कुटुंबीयांचं कोणासोबतही वैर नाही. त्यांनी पोलिसांचा तो दावाही फेटाळला आहे, ज्यात खासगी वादामुळे त्यांच्या मुलाची हत्या झाल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी तीन अज्ञात आरोपींविरोधात एफआयआर दाखल केलं आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. हिंदू पत्रकाराच्या हत्येच्या या घटनेची अलोचना करत पाकिस्तानच्या राष्ट्रीय विधानसभेत असणारे हिंदू सदस्य लालचंद मल्ही म्हणाले, की हा चिंतेचा विषय आहे. पत्रकारांच्या एका गटानंही लालवानी यांच्या हत्येविरोधात विरोध प्रदर्शन केलं आहे. सोबतच अंत्यसंस्कारानंतरही एक मार्च काढण्यात आला. पाकिस्तानात हिंदू सर्वाधिक मोठा अल्पसंख्यांक समुदाय आहे. अधिकृत अंदाजानुसार, पाकिस्तानात 75 लाख हिंदू राहातात. पाकिस्तानातील बहुतेक हिंदू नागरिक हे सिंध प्रांतात आहेत. याच सिंधू प्रांतात हिंदू पत्रकार अजय लालवानीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shot dead

    पुढील बातम्या