मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पिंपरीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीकडून सुरू होता वेश्याव्यवसाय, दोघांना अटक

पिंपरीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीकडून सुरू होता वेश्याव्यवसाय, दोघांना अटक

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Pimpri: पिंपरी चिंचवड शहरात अवैध पद्धतीनं सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी एका लॉजवर छापेमारी करत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

पिंपरी, 26 फेब्रुवारी: पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात अवैध पद्धतीनं सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (High profile sex racket exposed) करण्यात आला आहे. पोलिसांनी एका लॉजवर छापेमारी करत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक (2 Accused arrested) केली आहे. तसेच वेश्या व्यावसायात गुंतलेल्या एका अभिनेत्रीसह दोन अन्य तरुणींची सुटका केली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी ताथवडे परिसरातील येथील लॉजवर ही छापेमारी (Raid at lodge) केली आहे. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल असं अटक केलेल्या 48 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो सध्या वाघोली परिसरातील राहत असून तो मूळचा राजस्थानातील रहिवासी आहे. तर हेमंत प्रणाबंधू साहू (32) असं अटक केलेल्या अन्य आरोपीचं नाव असून तो मूळ ओडिशा येथील रहिवासी आहे. त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-लग्नाची मागणी जीवावर बेतली; तरुणानं GF ला लॉजवर बोलावून केला घात, मुंबईतील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र आणि हेमंत हे साथीदार मुकेश, करण, युसूफ यांच्या मदतीने हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आरोपी वेश्या व्यावसायासाठी तरुणींना विविध लॉजवर पाठवत होते. याठिकाणी तरुणीच्या नावावर बुकींग केलं जायचं. त्यानुसार ग्राहकांना पाठवून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. पण सामाजिक सुरक्षा पथकाला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती.

हेही वाचा-वेबसीरीजमध्ये निवड झाल्याचं सांगत बोलावलं अन्..; मराठी अभिनेत्रीसोबत घडलं भलतंच

त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी एका अभिनेत्रीसह अन्य दोन तरुणींची सुटका केली आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणींच्या मदतीनेच दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. वेश्या व्यवसायाचे पैसे घेऊन जाण्यासाठी बोलावून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सुटका केलेल्या मुलींमध्ये एक छत्तीसगडची अभिनेत्री आहे. दुसरी राजस्थान तर तिसरी मुंबई येथील आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 10 हजार रुपये रोख रक्कम, 9 हजार 500 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केलं आहे. या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Pimpri chinchawad, Pune, Sex racket