वाशिम, 4 एप्रिल : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन नजीकच्या गावात एका तरुणाचा गळफास लावलेला मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाचं नाव संतोष संभाजी जाधव आहे. या 30 वर्षीय युवकाचा मृतदेह गळफास लागलेल्या अवस्थेत आढळल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. 03 एप्रिल रोजी सायंकाळी हा मृतदेह आढळून आल्याचं सांगितलं जात आहे. संतोष जाधव हा आपल्या आई-वडिलांसोबत वाशिम येथे राहत होता. त्याचे मूळ गाव असलेल्या मुठठा येथे सुद्धा त्याचं घर आहे.
गेल्या दोन-तीन दिवसापासून संतोष जाधव हा मुठठा येथे आला होता. आज त्याचा मृतदेह घराच्या टिन पत्रा खालील लाकडाला गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी शिरपूर पोलीस स्टेशनचे एएसआय प्रकाश सरनाईक, पोलीस कॉन्स्टेबल जगदीश दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करीत आहेत. संतोष जाधव या युवकाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून तपासांनंतर कारण पुढे येईल.
हे ही वाचा-अयोध्येत महंताची विटेनं ठेचून निर्घृण हत्या, परिसरात खळबळ
संतोष जाधव याने आत्महत्या केली व त्याची हत्या करण्यात आली याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.