जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मुंबईत दादर स्टेशनवर RPF च्या CIB ची मोठी कारवाई, 67.44 लाखांची रक्कम जप्त

मुंबईत दादर स्टेशनवर RPF च्या CIB ची मोठी कारवाई, 67.44 लाखांची रक्कम जप्त

मुंबईत दादर स्टेशनवर RPF च्या  CIB ची मोठी कारवाई, 67.44 लाखांची रक्कम जप्त

मुंबईतील दादर स्थानकावर (Dadar station in Mumbai) रेल्वे संरक्षण दलाच्या गुन्हे गुप्तचर शाखेनं (CIB) 67.44 लाख (seized Rs 67.44 lakh) रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी: मुंबईत रेल्वे सुरक्षा दलाच्या (Railway Security Force) सीआयबी (CIB squad) पथकाला (Criminal Intelligence Branch) मोठं यश मिळालं आहे. मुंबईतील दादर स्थानकावर (Dadar station in Mumbai) रेल्वे संरक्षण दलाच्या गुन्हे गुप्तचर शाखेनं (CIB) 67.44 लाख (seized Rs 67.44 lakh) रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. यासोबतच कारवाईदरम्यान सीआयबीच्या पथकानं पैसे घेऊन जाणाऱ्या हवाला रॅकेटमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, मध्य रेल्वेनं सापळा रचून प्लेटफॉर्म क्रमांकावर हवालाची रक्कम घेऊन जाण्यासाठी थांबलेल्या अमरावतीहून आलेल्या सेंधाराम खुमाराम याला अटक केली. त्यामुळे 67,44,500/- इतकी रक्कम वसूल करण्यात आली. सध्या रेल्वे सुरक्षा दल पुढील तपास करत आहे. Spider-Man ला टक्कर देणारा अवलिया, 15 सेकंदात चढतो तीन मजली इमारत; Watch Video मध्य रेल्वेनं जारी केलेल्या माहितीनुसार, सीआयबी पथकाला मिळालेल्या इनपुटच्या आधारे कॉन्स्टेबल नीळकंठ गोरे, विनोद राठोड आणि विजय पाटील यांनी सापळा रचून दादर येथील प्लेटफॉर्म क्रमांक 1 वर अमरावतीहून आलेल्या सेंधाराम खुमाराम याला अटक केली. जो हवालाची रक्कम देण्याची वाट पाहत होता. मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, उपसंचालक आयकर (तपास) मुंबई आणि सीआयबी टीमच्या इतर सदस्यांच्या उपस्थितीत सेंधराम खुमाराम याची आरपीएफ पोस्टवर चौकशी करण्यात आली आणि त्याच्याकडून 67,44,500/- रुपये जप्त करण्यात आले. रक्कम वसूल करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी ते संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात