मराठी बातम्या /बातम्या /Viral /

खऱ्याखुऱ्या आयुष्यात Spider-Man ला टक्कर देणारा अवलिया, अवघ्या 15 सेकंदात चढतो तीन मजली इमारत, Must Watch

खऱ्याखुऱ्या आयुष्यात Spider-Man ला टक्कर देणारा अवलिया, अवघ्या 15 सेकंदात चढतो तीन मजली इमारत, Must Watch

सध्या एक हटके व्हिडिओ (Video Viral) व्हायरल होत आहे. आतापर्यंत तुम्ही स्पायडर मॅनला (Spider-Man) कार्टून आणि सिनेमात पाहिलं आहे. पण खरोखरच स्पायडर-मॅन तुमच्या समोर आला तर?

  नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: सध्या एक हटके व्हिडिओ (Video Viral) व्हायरल होत आहे. आतापर्यंत तुम्ही स्पायडर मॅनला (Spider-Man) कार्टून आणि सिनेमात पाहिलं आहे. पण खरोखरच स्पायडर-मॅन तुमच्या समोर आला तर? होय, असंच काहीसं या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण जगात अनेक लोक अशा धोकादायक गोष्टी करतात ज्यामुळे त्यांना भीती वाटत नाही. आग लागल्यास जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जीव धोक्यात घालतात. लोकांचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीत घुसताना तुम्ही अनेकदा पाहिले असतील. अशाच एका फायर फायटरचा (Firefighter) व्हिडिओ सोशल मीडियावर (Going viral on social media) व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती स्पायडर मॅनसारख्या वेगानं इमारतीवर चढताना दिसत आहे. बुल्गारियाच्या फायर फायटरनं दाखवला पराक्रम सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही शॉक व्हाल. या व्हिडिओमध्ये जॉर्ज नावाचा व्यक्ती दाखवण्यात आला आहे. ही व्यक्ती बुल्गारियाची रहिवासी असून अग्निशमन दलात कार्यरत आहे. व्हिडिओतील या व्यक्तीचा वेग पाहून तुम्हीही त्याचे फॅन व्हाल. हातात शिडी घेऊन हा माणूस तीन मजली इमारतीकडे धावताना दिसत आहे. इंटरनेटवर लोकांनी या व्यक्तीला 'स्पायडर-मॅन' असं नाव दिलं आहे. धोकादायक स्टंट्स पाहून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर जॉर्जचं खूप कौतुक होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरनं लिहिलं की, 'खरं तर या व्यक्तीने 'स्पायडर मॅन'ची भूमिका साकारली पाहिजे. याआधी न्यूयॉर्कमधील एका फायर फायटरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो फिल्मी स्टंटप्रमाणे ट्रेनिंग पूर्ण करत होता.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Stunt video

  पुढील बातम्या