गांधीनगर, 28 जानेवारी: गुजरातमधील आणंद जिल्ह्यामध्ये (
Anand District, Gujrat) तिहेरी तलाकचे (
Triple Talaq Case) प्रकरण उघडकीस आले आहे. याठिकाणच्या एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीला सोशल मीडिया पोस्टद्वारे (
Triple Talaq Via Social Media Post) तिहेरी तलाक दिल्याचा आरोप पत्नीने केला आहे. सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परस्परांमधील वादामुळे या महिलेला घरातून हाकलून देण्यात आलं, त्यानंतर ती आई-वडिलांसोबत राहत होती. मात्र या महिलेला तिहेरी तलाकविरोधी कायद्याविषयी माहिती नसल्याने या पूर्वी तिनं याबाबत तक्रार दिली नव्हती. पण या पूर्वी या महिलेनं पतीविरोधात छळाची तक्रारही पोलिसांत दाखल केली होती, अशी महिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, इन्स्टाग्राम (
Triple Talaq on Instagram) पोस्टच्या माध्यमातून तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी आणंद पोलिसांनी 28 वर्षाच्या तरूणाविरूध्द एफआयआर नोंदवला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये, आणंद जिल्ह्यातील उमरेठ तालुक्यातील एका 27 वर्षांच्या महिलेचा विवाह महिसागर जिल्ह्यातील देबर गावातील व्यक्तीशी झाला होता. या दोघांमध्ये भांडण झाले आणि पतीने घरातून हाकलून दिल्यानंतर ही महिला तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे वाचा-Shocking..! लष्कराच्या 3 जवानांकडून विवाहित महिलेवर Gangrape, बनवला अश्लील VIDEO
या प्रकरणी पीडित महिलेनं बुधवारी आई-वडिलांसह पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली. मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा, 2019 अंतर्गत तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं गेल्या वर्षी जुलैमध्ये भांडणानंतर तिहेरी तलाक दिला होता. या महिलेला तिहेरी तलाक कायद्याबाबत माहिती नसल्यानं तिने तक्रार दाखल केली नव्हती.
सब-इन्स्पेक्टर चेतनसिंह राठोड यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, पतीने यापूर्वी जुलैमध्ये तीन वेळा तलाक असं म्हटलं होतं. त्यावेळी या दोघांमध्ये भांडण झालं होतं आणि त्याने पीडितेला सासरच्यांनी घर सोडण्यास भाग पाडलं होतं. त्यावेळी या महिलेला तिहेरी तलाक विरोधातील कायद्याविषयी माहिती नव्हती आणि त्यामुळे तिने तक्रारही दाखल केली नाही, असं या महिलेनं आम्हाला सांगितलं. याआधी देखील महिलेनं पतीविरोधात छळाची तक्रार दाखल केली होती, असं राठोड यांनी सांगितलं.
हे वाचा-मशिदीतल्या इमामानं 8 वर्षांच्या मुलीला दिल्या नरकयातना, नंतर दिली कुराणाची शपथ
या महिलेला तिच्या पतीच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहायच्या असल्यानं तिनं वेगळ्या नावानं सोशल मीडिया अकाउंट सुरू केलं. परंतु, हे अकाउंट पत्नीचं असल्याचं पतीला समजल्यानंतर त्याने पुन्हा सोशल मीडियावर तिहेरी तलाक असं म्हटलं. त्यानंतर महिलेनं याबाबतची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली आणि बुधवारी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली, असं सब-इन्स्पेक्टर चेतनसिंह राठोड यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.