Home /News /national /

मशिदीत शिकण्यासाठी गेलेल्या 8 वर्षांच्या मुलीला दिल्या नरकयातना, नंतर दिली कुराणाची शपथ; इमामानं केला बलात्कार

मशिदीत शिकण्यासाठी गेलेल्या 8 वर्षांच्या मुलीला दिल्या नरकयातना, नंतर दिली कुराणाची शपथ; इमामानं केला बलात्कार

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मैनपुरी (Mainpuri) जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तर, येथील एका मशिदीतल्या इमामाने (Imam)आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

    उत्तर प्रदेश, 28 जानेवारी: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मैनपुरी (Mainpuri) जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तर, येथील एका मशिदीतल्या इमामाने (Imam)आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर गुन्हा केल्यानंतर आरोपी इमामने पीडितेला कुराणातून (Quran) शपथ दिली की, ती कोणालाच सांगणार नाही. मशिदीच्या इमामने (हाफिज) मुलीवर बलात्कार केला तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर इमामने तिला सोडून दिलं. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला याबाबत कोणाला सांगणार नाही, अशी शपथ दिली. मात्र घरी पोहोचल्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर मुलीच्या वडिलांनी इमामविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी (Police Station) तिला अटक करून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Corona निर्बंधासंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्यांना लिहिलं पत्र  किशनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात बुधवारी दुपारी 4 वाजता एक 8 वर्षीय मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत उर्दू शिकण्यासाठी गेली होती. जेथे बाराबंकी येथील रहिवासी हाफिज जमाल अहमद याने मुलीच्या मैत्रिणीला आमिष दाखवून बाहेर पाठवले. त्यानंतर मुलीवर बलात्कार केला. घटनेनंतर पीडितेने तिच्या मैत्रिणीला संपूर्ण माहिती दिली, त्यानंतर मैत्रिणीने घरी जाऊन सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. नातेवाईकांनी पीडित मुलीची विचारपूस केली असता तिने सांगितले की, हाफिजने तिला या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना देणार नाही अशी शपथ दिली आहे. गेल्या 10 वर्षांपासून मशिदीत उर्दू शिकवत आहे या घटनेने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी थेट मशीद गाठून आरोपी हाफिजला पकडून बेदम मारहाण केली. या गोंधळाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हाफिजला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात पाठवले. पोलीस स्टेशन प्रभारी किश्नी धर्मेंद्र कुमार यांनी सांगितले की, आरोपी गेल्या 10 वर्षांपासून मशिदीत राहून मुलांना उर्दू शिकवतो. 52 वर्षीय आरोपी इमाम जमाल अहमद गेल्या दहा वर्षांपासून मशिदीचा कारभार पाहत आहे आणि येथे मुलांना शिकवतो. पीडित मुलगी मशिदीत शिकण्यासाठी जात असे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Rape, Uttar pradesh

    पुढील बातम्या