Home /News /crime /

लग्नाच्या दिवशी नवरदेव आणि वरात आलीच नाही, वधूने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि...

लग्नाच्या दिवशी नवरदेव आणि वरात आलीच नाही, वधूने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि...

वरमुलगा न आल्याने एक वधूने थेट पोलीस ठाणे (Bride in Police Station) गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) वधूने वरपक्षाची तक्रार केली.

  पिंपरी, 16 मे : वरमुलगा न आल्याने एका वधूने थेट पोलीस ठाणे (Bride in Police Station) गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) वधूने वरपक्षाची तक्रार केली. यानंतर वरपक्षाच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाची तारीख शनिवारी 14 मे ही ठरली होती. रामकृष्ण मंगल कार्यालयात हे लग्न होणार होते. लग्नाच्या दिवशी वधू आणि वधूकडील मंडळी मंगल कार्यालयात पोहोचले होते.  ते सर्वजण वराकडील मंडळीची वाट पाहत होते. मात्र, वर आणि वराकडील मंडळी आले नाहीत. यामुळे संतापलेल्या वधूने थेट पोलीस ठाणे गाठले. आणि संबंधितांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी वरपक्षाच्या मंडळीवर गुन्हा दाखल केला आहे. यांच्यावर गुन्हा दाखल - अक्षय प्रदीप कोतवडेकर (वय 28), प्रदीप पांडुरंग कोतवडेकर (वय 62), आदित्य प्रदीप कोतवडेकर (वय 27), वंदना प्रदीप कोतवडेकर (वय 56), किरण सुतार (वय 52) आणि मध्यस्थी यांच्याविरोधात पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...तरीही वरपक्षाच्या मागण्या सुरुच - वधूने सांगितलेली माहिती अशी की, वराकडील मंडळी तिला रितीरिवाजाप्रमाणे पाहायला आली होती. यानंतर त्यांनी तिला पसंत केले. तसेच साखरपुडाही केला आणि लग्नाची तारखी ठरवून दिली होती. यामुळे तरुणीच्या कुटुंबींयांनी यादीत ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी पूर्ण केल्या. मात्र, यानंतरही वरपक्षाच्या लोकांनी वेगवेगळ्या मागण्या सुरुच ठेवल्या. हेही वाचा - पत्नीने 50 हजारांत दिली पतीची सुपारी; प्रियकर आणि मुलानेही केली मदत
  दिवसभर केली वरपक्षाची प्रतिक्षा -
  लग्नाची तारीख शनिवारी 14 मे ही ठरली होती. यामुळे ठरल्यानुसार, रामकृष्ण मंगल कार्यालयात वधू आणि वधू पक्षाकडची सर्व मंडळी पोहोचली. मात्र, वर आणि वरपक्षाची मंडळी मंगल कार्यालयात आलेच नाहीत. इतकेच नव्हे तर वधूने आणि तिच्याकडच्या मंडळींनी दिवसभर त्यांची प्रतिक्षा केली. मात्र, वरपक्षाचं कोणीही मंगल कार्यालयात पोहोचले नाही. अखेर वधूने थेट सजलेल्या पोषाखातच पिंपरी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bride, Bridegroom, Pimpri chinchavad, Police

  पुढील बातम्या