कानपूर, 20 मार्च: कोरोना विषाणूमुळे सध्या देशात बेरोजगारीची (Unemployment) समस्या अनेक युवक-युवतींना भेडसावत आहे. सध्या देशात नोकऱ्यांची कमतरता असल्याने युवा वर्गाला नोकरी शोधत फिरावं लागत आहे. अशातच नोकरीच्या शोधात आलेल्या एका युवतीला सरकारी बाबुने (Government Employee) अश्लील मेसेज (Offensive message) करून संतापजनक मागणी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी युवतीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना कानपूरच्या ग्रामीण विकास भवन येथील आहे. याठिकाणी जिल्ह्यातील बरेच बेरोजगार नोकरीच्या शोधात येतात. पण येथील सरकारी बाबू विनोद मिश्राने नोकरी देण्याच्या नावाखाली बेरोजगार मुलींचा छळ सुरू केला आहे. संबंधित आरोपी नोकरीच्या शोधात आलेल्या मुलींचे मोबाईल नंबर घेऊन नोकरीचं आमिष दाखवून अश्लील मेसेज पाठवत आहे. पण आकांक्षा नावाच्या एका बेरोजगार मुलीने सरकारी बाबुच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश केला आहे. यावेळी आकांक्षाने सांगितलं की, ती विकास भवन याठिकाणी नोकरीसाठी गेली होती. यावेळी तिची भेट विकास भवनातील सरकारी बाबू विनोद मिश्रा यांच्याशी झाली. यावेळी विनोद मिश्राने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि सांगितलं की, नोकरीबद्दल तुम्हाला माहिती देईन. यानंतर आरोपीने आकांक्षाला अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली. यावेळी आकांक्षाने त्याला नकार दिला. यावेळी तो म्हणाला की, हे ठीक नाहीये. मी तुमच्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहे, त्यामुळे मलाही तुझ्याकडून काहीतरी हवं आहे. (वाचा - फेसबुकमुळे 17 वर्षांनंतर सापडला नराधम! ऑफिसमध्ये केला होता बलात्कार ) पीडिताने अकबरपूर पोलिसांत दिली तक्रार आरोपी विनोद मिश्रा हा विकास भवनमधील कृषी विभागात लिपिक म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात येणाऱ्या बेरोजगार युवा वर्गावर त्याचं लक्ष असतं. पीडित आकांक्षाने तक्रारीत म्हटल्यानुसार, आरोपीने तिला अनेक अश्लील व्हिडीओदेखील पाठवले होते. यानंतर आकांक्षाने अकबरपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध लेखी तक्रार दिली. आकांक्षाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पुढील कारवाई केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.