पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चक्क सोन्याचं टॉयलेट; तपास यंत्रणाही चक्रावली

भ्रष्टाचार आणि लाच घेऊन या पोलिसाने अक्षरशः घराचा राजमहाल करुन टाकला होता.

भ्रष्टाचार आणि लाच घेऊन या पोलिसाने अक्षरशः घराचा राजमहाल करुन टाकला होता.

  • Share this:
    मॉस्को, 22 जुलै : शासकीय अधिकारी, पोलिसांनी लाच घेतल्याची त्यातून मोठी संपत्ती जमवल्याची आपण अनेक उदाहरणे पाहतो. अनेकदा अशा लाच प्रकरणातील संपत्तीचे आकडे डोळे विस्फारुन टाकणारे असतात. हे सर्व पाहिल्यावर आपल्या मनात नकळत संतापाची भावना निर्माण होते. रशियामध्ये (Russia) अशाच एका भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याचे (Corrupt Police Officer) कारनामे समोर आले असून, त्याने भ्रष्टाचार आणि लाचेच्या माध्यमातून अक्षरशः घराचा राजमहाल करुन टाकला होता. जेव्हा हे सर्व उघडकीस आलं आणि यंत्रणा तपाससाठी त्या अधिकाऱ्याच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्याचं घर पाहून तपास अधिकारीच काही क्षणांसाठी हादरुन गेले. हे नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घेऊया. कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची एवढी अर्थिक कुवत असते का की तो सोन्याचे टॉयलेट (Golden Toilet) वापरु शकेल? या प्रश्नावर तुमचे उत्तर साहजिक नाही असेल. परंतु, रशियातील एका भ्रष्ट वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने लाच (Bribery) घेत मोठी संपत्ती जमा केली आणि घराचा राजमहाल करुन टाकला होता. या संपूर्ण घटनाक्रमाचे वृत्त आज तकने दिले आहे. हे ही वाचा-कुत्र्याला बेदम मारहाण करून केली हत्या आणि मग..; तरुणाच्या अमानुष कृत्याचा VIDEO रशियन तपास समितीने (Russian Investigative Committee) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण रशियातील स्टावरोपोल येथील पोलिस अधिकारी एलेक्सी सफोनोव्ह आणि अन्य 6 जणांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. एका गुन्हेगारी टोळीला परमिट देण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या संशयावरुन त्यांना अटक (Arrest) करण्यात आली होती. अटक केलेल्यांमध्ये माजी वरिष्ठ वाहतूक अधिकारी, वाहतूक निरीक्षक आणि चार नागरिकांचा समावेश आहे. एलेक्सी सफोनोव्हने गुन्हेगारी टोळीकडून लाच घेत या टोळीला धान्य वाहतुकीचा परवाना दिला होता. या परवान्यामुळे या टोळीतील गुन्हेगार आरामात तपासणी नाके पार करुन गेले आणि त्यांची कुणी तपासणीही केली नाही, असं स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. याबाबत रशियातील सर्वात मोठा राजकीय पक्ष युनायटेड रशियाचे वरिष्ठ नेते अलेक्झांडर खिन्शेटिन यांनी सांगितले की 35 हून अधिक वाहतूक पोलिस अधिकऱ्यांना एका ऑपरेशनमध्ये अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या एफबीआय समकक्ष असलेल्या रशियन तपास समितीनं सांगितले की अधिकारी तसेच त्याच्या समवेत अटक करण्यात आलेल्या अन्य लोकांना 19 दशलक्ष रुबल म्हणजेच 1,91,77,266 रुपयांची लाच मिळाली होती. याबाबत तपास करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांच्या 80 ठिकाणच्या संपत्तींवर छापा टाकण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम, महागडया कार आणि कागदपत्रे आढळून आली. हा सर्व ऐवज जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जेव्हा तपास यंत्रणांनी आरोपी सफोनोव्हच्या घरी छापा टाकला तेव्हा ते घर म्हणजे राजमहालासारखे होते. या घरात भव्य खोल्या, आकर्षक सजावट आणि आश्चर्य म्हणजे टॉयलेटदेखील सोन्याचे होते. हे सर्व दृश्य पाहून तपास यंत्रणा आश्चर्यचकीत झाल्या. या यंत्रणेने भ्रष्टाचारातून जमवलेल्या या संपत्तीची फूटेज प्रसिद्ध केली आहेत.
    First published: