Home /News /crime /

पार्लरमध्ये डोळ्यांवर काकडी ठेऊन 20 मिनिटं बसली महिला, 2 तोळ्याची सोन्याची चेन झाली गायब

पार्लरमध्ये डोळ्यांवर काकडी ठेऊन 20 मिनिटं बसली महिला, 2 तोळ्याची सोन्याची चेन झाली गायब

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ब्युटी पार्लरमध्ये (beauty parlor) फेशिअल (facial) करताना डोळ्यावर काकडीचे काप ठेऊन बसलेल्या महिलेच्या 2 तोळ्याच्या सोन्याच्या चेनची (golden chain) चोरी झाली आहे.

    ग्वालियर, 22 ऑगस्ट : ब्युटी पार्लरमध्ये (beauty parlor) फेशिअल (facial) करताना डोळ्यावर काकडीचे काप ठेऊन बसलेल्या महिलेच्या 2 तोळ्याच्या सोन्याच्या चेनची (golden chain) चोरी झाली आहे. या चेनची किंमत सुमारे 90 हजार रुपये (Rs. 90 thousand) आहे. राखीपौर्णिमेनिमित्त ही महिला घराजवळच्या ब्युटी पार्लरमध्ये फेशिअल करण्यासाठी आली होती. चेहऱ्यावर फेस पॅक लावून तिच्या डोळ्यांवर काकडीचे थंडगार काप ठेवण्यात आले. मात्र याच काळात आपली सोन्याची चेन चोरली गेल्याची तक्रार या महिलेनं नोंदवली आहे. अशी झाली चोरी मध्यप्रदेशातील ग्वालियरमध्ये राहणाऱ्या रसिका शनिवारी संध्याकाळी परिसरातील ब्युटी पार्लरमध्ये गेल्या. फेशिअलला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्यांची सोन्याची चेन काढली आणि पर्समध्ये ठेऊन दिली. पर्स बाजूला ठेऊन त्या फेशिअलसाठी बसल्या. सुरुवातीला पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी रसिका यांच्या चेहऱ्यावर फेस पॅक लावला आणि तो वाळेपर्यंत डोळ्यांवर काकडीचे काप ठेऊन दिले. 20 मिनिटांनी चेहऱ्यावरील पॅक सुकल्यानंतर त्यांनी फेशिअल पूर्ण केलं. आपला चेहरा उजळल्याच्या आनंदात रसिका घरी पोहोचल्या. घरी पोहोचताच आपल्या पत्नीच्या गळ्यात चेन नसल्याचं पतीच्या लक्षात आलं. त्याने विचारणा केल्यानंतर चेन पर्समध्ये काढून ठेवल्याचं सांगत पर्स उघडली. मात्र पर्समध्ये चेनच नसल्याचं त्यांना दिसलं. ते पाहून त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तातडीने पार्लरमध्ये धाव घेतली. पार्लरमध्ये मात्र कुणीच याबाबत काहीही सांगायला तयार नसल्याचं त्यांना जाणवलं. हे वाचा -‘ती’ गोड बोलून फसवायची, ‘तो’ व्हिडिओ बनवून FIR ची धमकी द्यायचा! 20 मिनिटं आपण डोळे मिटून बसलो होतो. त्याच काळात आपली पर्स उघडून त्यातून सोन्याची चेन कुणीतरी काढून घेतली असावी, असा दाट संशय रसिका यांना आहे. फेशिअलला सुरुवात करण्यापूर्वी आपण स्वतःच ही चेन काढून ठेवली होती. त्यानंतरच ती गायब झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. पार्लरमधील कर्मचाऱ्यांपैकीच कुणीतरी हा प्रकार केला असून इतरही त्याला साथ देत असल्याचा आरोप रसिका यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकऱणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Gwalior, Theft

    पुढील बातम्या