मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

रिसेप्शनिस्टचा जीव जडला मित्रावर, लग्नाला परिवाराने होकार दिल्यावर त्याचं धक्कादायक कांड समोर अन्

रिसेप्शनिस्टचा जीव जडला मित्रावर, लग्नाला परिवाराने होकार दिल्यावर त्याचं धक्कादायक कांड समोर अन्

मेहक आणि कुलदीपच्या सांगण्यावरून घरच्यांनीही लग्नाला होकार दिला होता.

मेहक आणि कुलदीपच्या सांगण्यावरून घरच्यांनीही लग्नाला होकार दिला होता.

मेहक आणि कुलदीपच्या सांगण्यावरून घरच्यांनीही लग्नाला होकार दिला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India
  • Published by:  News18 Desk

इंदूर, 26 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग नगरमध्ये राहणाऱ्या मेहक या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती बीसीएची विद्यार्थिनी होती. अभ्यासासोबतच मेहक एका कार शोरूममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम करत होती. अनेक दिवसांपासून तिची कुलदीप डांगी नावाच्या तरुणाशी मैत्री होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघेही लग्नाच्या तयारीत होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहक आणि कुलदीपच्या सांगण्यावरून घरच्यांनीही लग्नाला होकार दिला होता. मात्र, याच दरम्यान, कुलदीपचे आणखी एक प्रेमप्रकरण समोर आले. त्याचे आणखी एका दुसऱ्या तरुणीवर प्रेम होते. काही दिवसांपूर्वीच त्याने मेहकला न सांगता दुसऱ्या तरुणीसोबत साखरपुडा केला होता. या घटनेची माहिती मेहकला मिळाल्यावर या दोघांमध्ये वाद झाला. कुलदीप अनेकदा मेहकला मारहाण आणि धमक्याही देत ​​असे, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीपच्या अशा प्रकारच्या वागण्याला कंटाळून मेहकने बुधवारी रात्री राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी काही वेळापर्यंत दोघे फोनवर बोलत होते. मेहकने आत्महत्या केली त्यावेळी घरी कुणी नव्हते. काही महिन्यांपूर्वी तिने छतावर चढून उंचावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, कसेतरी घरच्यांनी त्याला समज देऊन खाली उतरवले.

हेही वाचा - दिराच्या प्रेमात वेडी झाली महिला, तीन महिन्यांपासून रचत होती पतीच्या हत्येचा कट अन्...

यानंतर कुटुंबीयांनी तिला पोलीस ठाण्यात नेले होते. तेथे पोलिसांनी आणि कुटुंबीयांनी तिला सल्ला दिला. तिने तो कसा तरी मान्य केला. मात्र, हा सल्ला जास्त काळ काम करू शकला नाही. अखेर बीसीएची विद्यार्थिनी असलेल्या मेहकने तिच्या प्रियकराच्या वागण्याला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली.

First published:

Tags: Crime news, Love story, Madhya pradesh