जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / दिराच्या प्रेमात वेडी झाली महिला, तीन महिन्यांपासून रचत होती पतीच्या हत्येचा कट अन्...

दिराच्या प्रेमात वेडी झाली महिला, तीन महिन्यांपासून रचत होती पतीच्या हत्येचा कट अन्...

दिराच्या प्रेमात वेडी झाली महिला, तीन महिन्यांपासून रचत होती पतीच्या हत्येचा कट अन्...

अनैतिक संबंधात वेडी झाल्यामुळे आरोपी पत्नीने तब्बल तीन महिन्यांपासून आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला होता.

  • -MIN READ Madhya Pradesh
  • Last Updated :

सतना, 26 ऑगस्ट : अनैतिक संबंधातून खूनाच्या अनेक बातम्या समोर येत असतात. आता मध्यप्रदेश राज्याच्या सतना जिल्ह्यातील बिहारपुरवा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वहिणीने आपल्या दिरासोबत मिळून पतीची हत्या केली आहे. या घटनेनंतर 24 तासांच्या आत पोलिसांनी कसून तपास करत घटनेचा खुलासा केला. तसेच यानंतर आरोपी दीर आणि वहिनीला अटक केली आहे. काय आहे प्रकरण - अनैतिक संबंधात वेडी झाल्यामुळे आरोपी पत्नीने तब्बल तीन महिन्यांपासून आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला होता. सतना जिल्ह्यातील बरुधा पोलीस स्टेशन हद्दीतील बेहरपुरवा येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय राजोलची मंगळवारी रात्री उशिरा हत्या करण्यात आली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी मृताचा मृतदेह खोलीत आढळून आला. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असता दोरीने गळा आवळून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले. घटनास्थळी काही खुणा सापडल्या तसेच बांगड्या तुटलेल्या आढळून आल्या. मृताची पत्नी मृतदेहाजवळ उभी होती. पण दीर हा अनुपस्थित होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीत दीर आणि वहिनीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपी दीर धीरजचा शोध सुरू केला असता तो शेतातील झोपडीत लपलेला आढळून आला. पोलिसांना पाहताच तो पळू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजोलचा पाच वर्षांपूर्वी गायत्रीसोबत विवाह झाला होता. मात्र, वर्षभरातच गायत्रीचे राजोलचा धाकटा भाऊ धीरजसोबत अनैतिक संबंध बनले. काही दिवसातच संपूर्ण कुटुंबाला याची माहिती झाली. त्यामुळे लोकांनी निर्बंधही लादण्यास सुरुवात केली. मात्र, या प्रकारामुळे गायत्री आपल्या मार्गात अडसर ठरणाऱ्या पतीला दूर करण्याचा डाव रचायला सुरुवात केली. तीन महिन्यांपूर्वी तिने पतीला दुधात कीटकनाशक मिसळून प्यायला दिले होते. पण नवऱ्याने दुधाचा वास घेतला आणि तो ते दुध प्यायला नाही. त्यामुळे जीव वाचला. हेही वाचा -  Shocking! रोमान्स करताना चढला इतका जोश की तरुणीने पाडला त्याच्या कानाचा तुकडा; कचाकचा चावूनही खाल्ला गायत्री आणि तिचा दिर दोन्ही वेगळे होण्याचे नाव घेत नव्हते. हे प्रकरण इतके वाढले की, सासरच्यांनी गायत्रीच्या आई-वडिलांना भावाला कळवले  आणि गायत्रीला तिच्या माहेरी पाठवले. 15 दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबात आपसी समझोता होऊन गायत्री मागचे सर्व विसरून पतीसोबत नव्याने राहण्यासाठी सासरी आली. पण यावेळी त्यांनी मोठा कट रचला. या कटात दिराला सामील करून घेतले आणि नंतर दोघांनी मिळून नवऱ्याचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात