विकृतीची हद्द! 90 वर्षांच्या महिलेवर त्यानं केला बलात्कार आणि पकडले जाण्याच्या भयानं जीवही घेतला

विकृतीची हद्द! 90 वर्षांच्या महिलेवर त्यानं केला बलात्कार आणि पकडले जाण्याच्या भयानं जीवही घेतला

आरोपी तरुण फरार आहे. स्त्रियांशी असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारी त्याच्याविरोधात केल्या गेल्या होत्या.

  • Share this:

हैदराबाद, 2 मार्च : महिलांवरच्या अत्याचारांची दररोज एकेक प्रकरणं समोर येत आहेत. दिवसाढवळ्या जिवंत जाळण्यापासून ते अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या बातम्या स्त्रिया किती असुरक्षित आहेत याची साक्ष देत असतात. पण तेलंगणातून आलेली एक बातमी या सगळ्या नकारात्मक बातम्यांवर कडी करणारी आहे. 90 वर्षांच्या वृद्धेवर एका नराधमाने बलात्कार केला आणि पकडले जाऊ या भयाने नंतर तिला मारून टाकलं.

अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे तेलंगणातल्या अनुमुला या गावात. नळगोंडा जिल्ह्यात हलिया मंडलजवळ हे गाव आहे. 90 वर्षांच्या या आजीबाई एकट्याच राहायच्या. त्यांच्या मुलाचं घर जवळच होतं. मुलगा आणि सून म्हाताऱ्या आईचं हवं-नको पाहायचे. रविवारी सकाळी सासूबाईंना चहा देण्यासाठी त्यांच्या घरी गेलेल्या सुनेला त्यांचा मृतदेहच दिसला. घाबरून जाऊन तिने आरडाओरडा केला. पोलिसांना वर्दी देण्यात आली.

वाचा - फाशी पुन्हा लांबणीवर! निर्भयाचे गुन्हेगार पुढच्या आदेशापर्यंत फासावर नाहीत

पोलिसांना या 90 वर्षीय महिलेच्या शरीरावर दात आणि नखांच्या जखमा दिसल्या. या आजीबाईंवर मृत्यूपूर्वी बलात्कार झाल्याचं उघड होत आहे. या आजींच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल करताना सत्रसाला शंकर या 22 वर्षीय तरुणावर संशय व्यक्त केला आहे. तो आपल्या आईच्या घराजवळ दारूच्या नशेत फिरताना आढळला होता, असं या तक्रारीत मुलाने म्हटलं आहे.

22 वर्षांचा शंकर हा हमाल म्हणून काम करतो. स्त्रियांशी असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारी त्याच्याविरोधात केल्या गेल्या होत्या. गावातल्या अनेक स्त्रियांना त्यानं छेडलं होतं, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पोलीस या शंकरचा शोध घेत आहेत. या गुन्ह्यानंतर तो फरार झाला आहे. दरम्यान या वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नळगोंड्याच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

वाचा - महाराष्ट्राला हादरला! बलात्काराची केस मागे घेण्यासाठी नवरा-बायकोला बेदम मारहाण

First published: March 2, 2020, 6:00 PM IST

ताज्या बातम्या