जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / तब्बल महिनाभर नाल्यात पडून होता मृतदेह, तरीही राहिला नीट; पोलिसही चक्रावले

तब्बल महिनाभर नाल्यात पडून होता मृतदेह, तरीही राहिला नीट; पोलिसही चक्रावले

तब्बल महिनाभर नाल्यात पडून होता मृतदेह, तरीही राहिला नीट; पोलिसही चक्रावले

अनेकदा गुन्हेगारी प्रकरणात अशा घटना समोर येतात ज्यानं पोलिसही चक्रावून जातात. गाजियाबाद इथं अशीच घटना उघड झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गाजियाबाद, 11 फेब्रुवारी : दिल्लीजवळील (Delhi) गाजियाबादच्या (Ghaziabad) संजय नगर इथून एक प्रकाश त्यागी (Prakash Tyagi) नावाची व्यक्ती हरवली होती. पोलिसांनी (police) कसून शोध घेतल्यावरही या व्यक्तीचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. आता मात्र या रहस्याचा उलगडा झाला आहे. प्रकाश त्यागी यांचा मृतदेह (dead body) एका नाल्यात (gutter) सापडला आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट ही, की तब्बल एक महिन्याहून अधिक काळ हे प्रेत नाल्यात पडलेलं असूनही सुरक्षित आणि नीट अवस्थेत (good condition) राहिलं आहे. ज्या नाल्यामध्ये मृतदेह सापडला त्यात विविध कारखान्यांमधील रसायनयुक्त पानी भरलेलं होतं. पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी मृतदेह नाल्यातून काढत पोस्टमार्टमसाठी पाठवला. मंगळवारी दुपारी मृतदेहाचं पोस्टमार्टम (postmortem) केलं गेलं. प्रशासकीय अधिकारी अवनीश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना वाटलं होतं, की दीर्घकाळ शव नाल्यात पडून असल्यानं कुजलं असेल. मात्र तसं झालं नव्हतं. आरोपींनी मृतदेहाची पॅकिंग खूपच व्यवस्थित केली होती. मृतदेहावर तीन लेअर्समध्ये प्लास्टिक गुंडाळलेलं होतं. वरून एक प्लास्टिक बॅग (plastic bag) होती. मंगळवारी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करून ते नातेवाईकांकडे दिलं गेलं. हेही वाचा अखेर बिंग फुटलं, आठ जणांची हत्या करुन आश्रमात राहणाऱ्या भोंदू बाबाला अटक! प्रकाश त्यागी यांच्याकडून काही लोकांनी रक्कम (money) उधार घेतली होती. ती द्यायला लागू नये यासाठी त्याची हत्या करण्यात आली. आरोपी महिला आणि तिचा पती ज्ञान प्रकाश यानं त्यागी यांचा मृतदेह नीट पॅक करून विजय नगरच्या औद्योगिक क्षेत्राजवळच्या नाल्यात टाकून दिला. पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी आरोपींना पकडलं. त्यांच्याकडून गोष्टी वदवून घेत नाल्यातून मृतदेह बाहेर काढला गेला. आता पोलीस तिसरा आरोपी असलेल्या उमेश या रिक्षावाल्याचा तपास करते आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात