मोठी बातमी, पुण्यातील आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकर अखेर गजाआड

त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • Share this:
पुणे, 03 मार्च : पुण्यातील सर्वात जुन्या गुन्हेगारी टोळ्या पैकी एक असलेल्या आंदेकर टोळीच्या मोरक्या बंडू आंदेकर (Bandu Aandekar) याला आज फरासखाना पोलिसांनी पहाटे खुनाचा प्रयत्न अटक केली आहे. आंबेकर टोळी गेली पंचवीस वर्ष पुण्यात गुन्हेगारी कारवाया करत असून प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खुनाच्या प्रकरणी बंडू आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा ही झालेली आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकरविरुद्ध १९८५ पासून खून, खुनाचे प्रयत्‍न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुण्यातील फरासखाना, खडक व समर्थ या पोलीस ठाण्यात, तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आंदेकर-माळवदकर टोळीयुद्धातून झालेल्या खूनप्रकरणात सूर्यकांत आंदेकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवायांना सुरुवात केली. त्याच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक तक्रार करण्यासही पुढे येत नव्हते. सू्र्यकांत आंदेकरचा भाऊ उदयकांत हा पुणे महापालिकेत 2012 पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगरसेवक होता.  गेली काही वर्ष आंबेकर टोळीचा वरचष्मा कमी झालेला होता आणि त्यातूनच अतुल कुडले याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितले. गेले काही दिवस कुडले याच्यामुळे आपल्या टोळीचा वर्चस्व कमी होत असल्याचा राग आंदेकर टोळीत होता.
Published by:sachin Salve
First published: