मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /संतापजनक! शिकवणीसाठी गेलेल्या दहावीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; विष पाजून केली हत्या

संतापजनक! शिकवणीसाठी गेलेल्या दहावीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; विष पाजून केली हत्या

Gang Rape and Murder News: शिकवणीसाठी (tuition) गेलेल्या एका दहावीच्या मुलीवर गावातील 4 युवकांनी (gang rape on 10th class student) सामूहिक बलात्कार केला आहे. एवढंच नव्हे, तर आरोपींनी बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीला विष पाजून हत्या केली आहे.

पुढे वाचा ...

मेरठ, 02 एप्रिल: देशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहे. अगदी काही महिन्यांच्या बालिकांपासून 50 वर्षांच्या महिलांपर्यंत अशा विविध वयोगटातील स्त्रीयांना वासनेचं शिकार बनवलं जात आहे. दोन दिवसांपूर्वी  पतिसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची घटना ताजी असताना, यामध्ये आणखी एका संतापजनक घटनेची भर पडली आहे. शिकवणीसाठी घरातून बाहेर पडलेल्या एका दहावीच्या मुलीवर काही (gang rape on 10th class student) जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

दहावीच्या वर्गात शिकणारी एक विद्यार्थिनी शिकवणीसाठी घरातून बाहेर पडली, मात्र ती क्लासपर्यंत पोहचलीच नाही. शिकवणीसाठी जात असताना वाटेतच गावातील काही तरुणांनी तिचा रस्ता अडवला आणि तिचं अपहरण केलं. यानंतर 4 आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नराधम एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित मुलीला विष पाजलं आहे. त्यानंतर आरोपींनी तिला मरण्यासाठी घटनास्थळी टाकून पळ काढला आहे.

बलात्काराच्या घटनेनंतर पीडित मुलगी अत्यंत वाईट अवस्थेत कशीबशी घरी परतली. त्यानंतर नातेवाईकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहचल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने अखेरचा श्वास घेतला आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा- संतापजनक! दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अडवलं; पतीसमोरच तिघांनी केला बलात्कार

मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी गावातील एका तरुणासोबतच आणखी तीन अज्ञात युवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडित परिवाराची तक्रार दाखल करून घेतली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी काही विशेष पथकं तयार केली आहेत. जागोजागी आरोपींचा शोध घेतला आहे, पण आरोपींचा अद्याप काहीही सुगावा लागला नाही.

First published:

Tags: Gang Rape, Murder, Uttar pradesh