दौसा 07 सप्टेंबर: राजस्थान मधल्या दौसा जिल्ह्यातलं आभानेरी हे गाव एका धक्कादायक घटनेने हादरुन गेलं आहे. मोबाईल आणि बाईकसाठी तरुण मुलं वाट्टेल ते करतात याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. मात्र सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आभानेरी गावात मांगीलाल आणि लालाराम हे दोन भाऊ आपल्या कुटुंबासोबत राहत होते. मांगीलाल हा लालारामचा मोठा भाऊ होता. तो कमावत असल्याने त्याच्याकडे स्मार्ट फोन आणि बाईक होती. मात्र तो लालारामला त्याचा वापर करू देत नव्हता.
त्यावरून त्या दोन भावांमध्ये भांडणही होत असे. त्यातच मांगीलालचं लग्न होत नव्हतं. त्याचाही लालारामला राग येत होता. मोठ्या भावामुळेच आपलंही लग्न रखडलं असं त्याला वाटत असे.
स्मार्ट फोन आणि बाईक घेण्याएवढे पैसेही त्याच्याजवळ नव्हते. घटनेच्या दिवशी त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. रागाच्या भरात लालारामने मोठा भाऊ असलेल्या मांगीलालवर कुऱ्हाडीने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
घरात काही तरी होतेय असं लक्षात आल्याने त्यांच्या आईने जेव्हा खोलीचं दार उघडलं तेव्हा त्यांना धक्कादायक प्रकार कळला. आई आरडाओरड करेल असं वाटल्याने त्याने आईवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यात ती जखमी झाली. पोलिसांनी हल्लेखोर भावा अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.