जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पतीच्या समोर हॉटेलमध्ये एका मित्राने पत्नीवर केला बलात्कार; दुसरा पोहोचला घरी अन्...

पतीच्या समोर हॉटेलमध्ये एका मित्राने पत्नीवर केला बलात्कार; दुसरा पोहोचला घरी अन्...

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

शेवटी पत्नीने संतापून आईला फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदीगड, 23 एप्रिल : हरयाणातील (Haryana News) रेवाडी जिल्ह्यात एका महिलेवर तिच्याच पतीच्या दोन मित्रांनी बलात्कार (Raped on Wife) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मित्राने पतीसमोर हॉटेलमध्ये मित्राने घरात घुसून महिलेसोबत घृणास्पद कृत्य केलं. या प्रकरणात पती आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार झाला आहे.

जाहिरात

रेवाडीच्या रामपूर भागातील पीडितेने सांगितलं की, 5 मार्च 2022 रोजी तिच्यासोबत पहिल्यांदा बलात्कार करण्यात आला. यावेळी महिलेचा पती तिला दिल्लीतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. येथे पतीच्या मित्राने तिच्यावर हॉटेलमध्ये बलात्कार केला. पतीने विरोध करण्याऐवजी तिला तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली. यामुळे पत्नीदेखील घाबरून गेली.

हे ही वाचा- Shocking! 10 अल्पवयीन जोडप्यांचं धुमधडाक्यात बाल विवाह, फोटोग्राफी अन् रिसेप्शन

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी तिचा पती आणि सासू एका नातेवाईकांकडे गेले होते. यावेळी पतीने दुसऱ्या मित्राला घरी बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी मात्र पत्नीने आपल्या आईला सांगितलं. आईने तातडीने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. 21 एप्रिल रोजी महिलेने पतीसह त्याच्या दोन्ही मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सायंकाळी उशिरा पती आणि त्याच्या एका मित्राला पोलिसांनी अटक केली, दोघांना शनिवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात