सूरत 15 फेब्रुवारी : आधी मैत्री आणि मग फसवणूक (Fraud) ही गोष्ट आजकाल अनेक ठिकाणी सर्रास घडताना दिसते. अशीच एक घटना आता सुरतमधूनही समोर आली आहे. एका महिलेनं हिऱ्यांचा व्यवसाय (Diamond Businessman) करणाऱ्या दुसऱ्या महिलेसोबत मैत्री केली. यानंतर मैत्रीत विश्वास निर्माण होताच व्यवसायाच्या नावावर तिच्याकडून 29 लाखाचे हिरे घेतले. मात्र, जेव्हा हिरा व्यापारी महिला बँकेत चेक घेऊन गेली तेव्हा तो बाऊंस झाला. यानंतर व्यापारी महिलेनं संबंधित महिलेकडे हिऱ्याचे उरलेले 27 लाख रुपये मागितले, तेव्हा तिनं ते देण्यास नकार दिला. हिरा व्यापारी महिलेनं या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली तेव्हा पोलिसांनी केवळ तक्रार दाखल करून घेतली. पुढे न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी महिलेवर कलम 202 अन्वये गुन्हा दाखल केला. सीमा देवी अग्रवाल या हिरा व्यापारी महिलेची ओळख काही दिवसांपूर्वी रवींद्र कौर अहुजा नावाच्या महिला व्यापारीसोबत झाली. दोघींची मैत्री इतकी घट्ट झाली, की रवींद्र कौरनं सीमा देवीकडून व्यापारासाठी 29 लाखाचे हिरे खरेदी करण्याची डील केली. यानंतर 28 मे 2019ला रवींद्र कौरनं सीमा देवीला 2 लाख रूपये रोख देत 29 लाखाचे हिरे खरेदी केले. रवींद्र कौरनं या बदल्यात 9 चेक दिले होते. मात्र, सीमा देवींना बँकेनं सांगितलं, की रवींद्र कौर यांच्या अकाऊंटमध्ये पैसेच नाहीत. सीमा देवीनं जेव्हा रवींद्र कौरला हिऱ्याचे पैसे मागितले तेव्हा तिनं पैसे देण्यास नकार दिला. यानंतर सीमादेवी याप्रकरणी ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांकडून काहीच मदत न मिळाल्यानं सीमादेवीनं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.