मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धक्कादायक! पेट्रोलमध्ये थेट पाण्याचीच भेसळ, पेट्रोलपंपाचं गैरकृत्य अखेर उघड

धक्कादायक! पेट्रोलमध्ये थेट पाण्याचीच भेसळ, पेट्रोलपंपाचं गैरकृत्य अखेर उघड

शाहरूखने त्याच्या मोटारसायकलमध्ये काही दिवसांपूर्वी प्रतापपुरातल्या एचपी पेट्रोल पंपावर (HP Petrol Pump) 500 रुपयांचं पेट्रोल भरलं होतं. पेट्रोल भरल्यानंतरही त्याची मोटारसायकल सुरू होत नव्हती. त्याने आपल्या गाडीला गॅरेजमध्ये नेलं तेव्हा धक्कादायक माहिती उघड झाली.

शाहरूखने त्याच्या मोटारसायकलमध्ये काही दिवसांपूर्वी प्रतापपुरातल्या एचपी पेट्रोल पंपावर (HP Petrol Pump) 500 रुपयांचं पेट्रोल भरलं होतं. पेट्रोल भरल्यानंतरही त्याची मोटारसायकल सुरू होत नव्हती. त्याने आपल्या गाडीला गॅरेजमध्ये नेलं तेव्हा धक्कादायक माहिती उघड झाली.

शाहरूखने त्याच्या मोटारसायकलमध्ये काही दिवसांपूर्वी प्रतापपुरातल्या एचपी पेट्रोल पंपावर (HP Petrol Pump) 500 रुपयांचं पेट्रोल भरलं होतं. पेट्रोल भरल्यानंतरही त्याची मोटारसायकल सुरू होत नव्हती. त्याने आपल्या गाडीला गॅरेजमध्ये नेलं तेव्हा धक्कादायक माहिती उघड झाली.

पुढे वाचा ...

  लखनऊ, 24 डिसेंबर : गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर शंभरीपार पोहोचले आहेत. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ (Adulteration), गाडीत इंधन भरताना आकड्यांमध्ये फेरफार करणं, इंधनचोरी आदी गैरप्रकार वाढले आहेत. यामुळे अर्थातच ग्राहकांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. उत्तर प्रदेशातल्या आग्रा (Agra) इथल्या एका पेट्रोल पंपावर (Petrol Pump) असाच एक गैरप्रकार नुकताच उजेडात आला आहे. या गैरप्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या पंपावर पेट्रोलमध्ये पाण्याची (Water) भेसळ केली जात होती आणि असं भेसळयुक्त इंधन ग्राहकांच्या माथी मारलं जात होते. हा प्रकार एका ग्राहकानं उघडकीस आणल्यावर संबंधित पंपाची चौकशी करण्यात आली. याबाबतचं वृत्त 'अमर उजाला'ने दिलं आहे.

  20 ते 30 मिली इंधन जाणीवपूर्वक कमी भरणं, युनिट मशीनमधल्या कार्डात फेरफार करणं, पेट्रोलमध्ये भेसळ करणं, पेट्रोल मशीनच्या पल्सरमध्ये फेरफार करणं असे गैरप्रकार पेट्रोल पंपांवर होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. यामुळे ग्राहकांना नुकसान सहन करावं लागतं. गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारचे गैरप्रकार आग्र्यातल्या काही पेट्रोल पंपांवर होत असल्याचं आढळून आलं आहे.

  ...आणि पेट्रोलपंपाचं गैरकृत्य उघड झालं

  प्रतापपुरा इथल्या एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर गाड्या बंद पडत असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. नामनेर येथील शाहरूखने त्याच्या मोटारसायकलमध्ये काही दिवसांपूर्वी प्रतापपुरातल्या एचपी पेट्रोल पंपावर (HP Petrol Pump) 500 रुपयांचं पेट्रोल भरलं होतं. पेट्रोल भरल्यानंतरही त्याची मोटारसायकल सुरू होत नव्हती. त्यानंतर त्याने मोटारसायकल गॅरेजमध्ये नेली. पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ असल्याचं तिथे स्पष्ट झालं. त्यानंतर शाहरुखने पंप चालकाकडे याबाबत तक्रार केली. तेव्हा तिथे नागरिकांची गर्दी झाली. बादली आणि बाटल्यांमधल्या पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ असल्याचं आढळून आलं. त्यानंतर नागरिकांनी पंपावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याबाबत माहिती मिळताच रकाबगंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी पंपावर पोहोचले. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढली; मात्र दुसऱ्या दिवशी या सर्व घटनेचे 5 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

  हेही वाचा : रामदास कदम विधानभवन परिसरात भडकले, वैभव खेडेकरांवर गंभीर आरोप

  आग्र्यात 215 पेट्रोल पंप आहेत. या पंपांची तपासणी करण्यासाठी तीन विभागांचं मिळून एक पथक स्थापन करण्यात येणार आहे. पेट्रोलियम कंपनी (Petroleum Company), पुरवठा विभाग आणि वजन व मापे विभागाच्या मदतीनं ही तपासणी केली जाणार आहे. याबाबत दोन दिवसांत कारवाई सुरू होईल. भेसळ आणि इंधन चोरी आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न आणि पुरवठा विभागाचे एडीएम जय नारायण यांनी दिली.

  हेही वाचा : हिवाळी अधिवेशन सुरु असताना विधान भवनाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

  यापूर्वीदेखील आग्र्यातल्या काही पंपांवर अशा प्रकारे भेसळ आणि पेट्रोल चोरीचे प्रकार उघडकीस आले होते. 16 नोव्हेंबरला शहीदनगर इथल्या जावेदने लॉरीज हॉटेलच्या समोरच्या फ्रेंड्स फिलिंग स्टेशनवर रात्री 10 वाजून 27 मिनिटांनी 200 रुपयांचं पेट्रोल भरलं. कम्प्युटराईज्ड बिल त्याला मिळालं. संशय आल्यानं जावेदनं विक्री रेकॉर्ड तपासलं असता त्यात 10 वाजून 27 मिनिटांनी 90 रुपयांची विक्री झाल्याचं आढळून आलं. त्याने या पेट्रोल चोरीची तक्रार शहरातल्या एडीएम कार्यालयाकडे केली. या पंपाचं विक्री रेकॉर्ड आणि टायमिंग मीटरमध्ये फेरफार आढळून आला आहे. याचा रिपोर्ट एडीएम (ADM) यांनी पाठवला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव सिंह यांनी दिली. परंतु, तपासणीदरम्यान कोणताही फेरफार झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे, असं पेट्रोल पंपाचे मालक करण दुग्गल यांनी सांगितलं.

  2017 मध्ये लखनौ भागात चिप (Chip) लावून पेट्रोल चोरी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर लखनौमधल्या सर्व पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोल चोरी केल्याप्रकारणी 24 पंपांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. यातले तीन पंप सील केले गेले. दोन वर्षांनंतर हे पंप पुन्हा सुरू झाले. आता पुन्हा असाच प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. व्हायरल व्हिडीओचीदेखील जोरदार चर्चा आहे.

  First published: