मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अमूल डेअरीची डिस्ट्रीब्युशनशिप मिळवून देतो, पुण्यात जेष्ठ नागरिकाला 10 लाखांचा गंडा

अमूल डेअरीची डिस्ट्रीब्युशनशिप मिळवून देतो, पुण्यात जेष्ठ नागरिकाला 10 लाखांचा गंडा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

देशभरात गुजरात राज्यातील आनंद येथील अमूल डेअरी प्रसिद्ध आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  News18 Desk

पुणे, 18 सप्टेंबर : मागच्या महिन्यात केएफसीची फ्रॅंचाईजी घेताना एका महिलेची तब्बल 79 लाख रुपयात फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यातील ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमूल डेअरीची डिस्ट्रीब्युशनशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाची लाखो रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. या जेष्ठ नागरिकाला तब्बल 10 लाख 42 हजार रुपयांचा गंडा लावण्यात आला.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

देशभरात गुजरात राज्यातील आनंद येथील अमूल डेअरी प्रसिद्ध आहे. त्याचाच गैरफायदा घेत आनंद येथील सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाला गंडवले आहे. अमूल डेअरीची डिस्ट्रीब्युशन फ्रॅन्चायझी देण्याचा बहाणा करुन त्याने तब्बल 10 लाख 42 हजार रुपयांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली. सायबर चोरट्यांनी आनंद येथील इंडियन बँकेच्या खात्याचा वापर केल्याचे तपासात आढळून आले आहे. याप्रकरणी एका 69 वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हा प्रकार 3 ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान घडला. फिर्यादीनंतर पोलिसांनी सायबर चोरटा व बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे़. आरोपीने फिर्यादी यांना फोन करुन अमूल डेअरी डिस्ट्रीब्युशन फ्रॅन्चायझी देण्याचा बहाणा केला होता. तसेच त्यासाठी त्यांच्या पतीला वेगवेगळी कारणे सांगून बँक खात्यावर पैसे पाठवायला सांगितले. त्यानुसार यांनी पैसेही भरले.

हेही वाचा - KFC फ्रँचाईजी उभारण्याचं रंगवलं स्वप्न; मात्र पुण्यातील महिलेला तब्बल 80 लाखांचा लावला चुना

गुजरातमधील आनंद येथे अमूलचा मुळ उद्योग आहे. त्यामुळे तेथील इंडियन बँक खात्यात पैसे भरायला सांगितल्याने फिर्यादी यांच्या पतीचा विश्वास बसला. आरोपीच्या सांगण्यावरुन अशाप्रकारे त्यांनी एका महिन्यात तब्बल 10 लाख 42 हजार रुपये भरले. तरीही त्यांच्याकडून मागणी होत होती. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यावर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक सातपुते याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. मागच्या महिन्यातच KFC फ्रँचाईजी देण्याच्या बहाण्याने एका महिलेची तब्बल 79 लाख 76 हजारात फसवणूक करण्यात आली होती. यानंतर आता ही घटना समोर आली आहे.

First published:

Tags: Franchise, Pune