सांगली, 24 जुलै : सांगलीच्या तासगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नर्स असल्याचे भासवून एका महिलेने एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण घटना - आरोपी महिलेने चार दिवसांपूर्वी तासगावात दोन रुग्णालयात नोकरीसाठी चौकशी केली होती. आणि यानंतर सरस्वती आनंद रुग्णालयात चार दिवसांपूर्वी नर्स म्हणून कामाला सुरुवात केली. या बोगस नर्स म्हणून कामावर येऊन आलेल्या महिलेने एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण केले. ही धक्कादायक सिद्धेश्वर चौकातील सरस्वती आनंद रुग्णालयात घडली. रविवारी सकाळी पावणेनऊ वाजेच्या दरम्यान हा प्रकार समोर आला. तासगाव येथील सिद्धेश्वर चौकातील सरस्वती आनंद रुग्णालयात एक महिला प्रसूत झाली. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक महिला नर्स असल्याचे भासवून संबंधितांच्या वार्डमध्ये गेली. आणि तेथून एक दिवसाच्या बालकाला घेऊन आपल्या काखेतील बॅगमध्ये टाकले. यानंतर बालकाला घेऊन आरोपी महिला तेथून तत्काळ पसार झाली. हेही वाचा - 5 वर्षाच्या पुतणीने मागितला आंबा; भडकलेल्या काकाने जे केलं ते वाचूनच उडेल थरकाप या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, आरोपी महिलेने रुग्णालयात दिलेला पत्ता हा चुकीचा आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.