जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Flipkart मध्ये फ्रॉड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पोलिसांची मोठी कारवाई

Flipkart मध्ये फ्रॉड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पोलिसांची मोठी कारवाई

Flipkart मध्ये फ्रॉड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पोलिसांची मोठी कारवाई

कंपनीकडून ग्राहकांपर्यंत त्यांचं मूळ सामान न पोहचल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. मूळ सामान न येता त्याऐवजी साबण, दगड पार्सल येत असल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून येऊ लागल्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी मुंबई, 27 फेब्रुवारी : फ्लिपकार्टमध्ये (Flipkart) टीम लीडर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने बनावट ग्राहकांचा पत्ता देऊन आणि ग्राहकांच्या पत्त्यावर बनावट वस्तू ऑर्डर करुन फ्लिपकार्ट कंपनीची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकांचा पत्ता न मिळाल्याने डिलिव्हरी बॉयकडून ते सामान परत येत होतं. हे परत आलेलं सामान फसवणूक करणारा व्यक्ती आपल्या घरी घेऊन जात होते. त्यानंतर ते सामान बाहेर काढून, त्या पॅकिंगमध्ये त्या सामानाऐवजी साबण किंवा इतर काही सामान ठेवून, पुन्हा पॅकिंग करून ते कंपनीत जमा करत होते. काही दिवसांनी कंपनीकडून ग्राहकांपर्यंत त्यांचं मूळ सामान न पोहचल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. मूळ सामान न येता त्याऐवजी साबण, दगड पार्सल येत असल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून येऊ लागल्या. अनेक तक्रारींनंतर कंपनीने याप्रकरणाची माहिती पोलिसांत दिली.

(वाचा -  जोशात बसला मोठा फटका! 70 रुपयांचं कंडोम पडलं 3 लाखाला )

त्यानंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. या चौकशीत ही संपूर्ण एक टोळीच असल्याचं समोर आलं. या टोळीचा मुख्य सुत्रधार फ्लिपकार्ट कंपनीतच काम करणारा टीम लीडर वाजिद शकील मोमिन असल्याचं उघड झालं. या 24 वर्षीय आरोपीला पोलिसांनी नवी मुंबईतील घनसोलीमधून अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याच्याकडून 11 ब्रँडेड मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत. तसंच कोपरखैरणे पोलिसांनी आणखी तिघांना ताब्यात घेतलं असून यांच्याकडून 8 लाख 24 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात