शामली, 18 जून : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. येथे राशीद नावाच्या मुस्लिम तरुणाने एका हिंदू मुलीला फूस लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुस्लिम तरुण हा गावातील रहिवासी असून त्याने एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न केले, असा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुलीचे कुटुंबीय आणि हिंदू संघटनेचे लोक बाबरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि लवकरात लवकर मुलीची सुटका करण्याची मागणी केली. मुलीचे नातेवाईक आणि हिंदू संघटनांचे म्हणणे आहे की, आरोपी रशीद, परवेज आणि नदीम यांचे नातेवाईक त्यांच्या साथीदारांसह त्यांच्या घरी पोहोचले होते. जिथे त्यांनी केस मागे न घेतल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे कुटुंबीय घाबरले आहेत. त्यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाईची मागणी केली. तर पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई न केल्यास महापंचायत आयोजित करू असा इशारा नातेवाईक आणि हिंदू संघटनांनी दिला आहे.
राशिदला चार बायका - ही घटना आदमपुर गावातली आहे. इथे राशिद शहीदवर हिंदू तरुणीला पळवून नेल्याचा आरोप आहे. असे सांगितले जात आहे की, राशिदने 4 लग्न केले आहेत. त्यापैकी एक मुस्लिम आणि तीन हिंदू मुली असल्याचा आरोप आहे. आणि आता त्याने आणखी गावातील आणखी एका हिंदू मुलीला पळवून नेले आहे. तसेच दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याचे बोलले जात आहे. मात्र, रशीद आणि हिंदू तरुणीचा अद्याप कोणताही पत्ता लागला नाही. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी शामली येथील बाबरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला, तरी राशीद आणि हिंदू धर्मातील या मुलीचा अद्याप शोध लागलेला नाही. याच्या निषेधार्थ कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून घेराव घातला आणि कारवाई न झाल्यास हिंदू संघटनांनी बाबरी पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना महापंचायतीचा इशारा दिला आहे. महापंचायतीचा इशारा - राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांमुळे हिंदू संघटना प्रचंड संतापल्या आहेत. हिंदू संघटनेचे स्वामी यशवीर महाराज म्हणाले की, जर पोलिसांनी मुलीला त्वरीत परत आणले नाही तर पुढील कृती ठरवू. दुसरीकडे, बाबरी पोलीस स्टेशनचे म्हणणे आहे की, संबंधित प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे. सध्या मुलीला लवकरात लवकर परत आणण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. राशीदचे मित्र आणि नातेवाईक त्यांच्यावर सतत दबाव आणत असून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कुटुंबीयांना काही झाले तर त्याला शाल्मली पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असे त्यांनी म्हटले आहे.