डेहराडून, 21 सप्टेंबर : उत्तराखंडमधील डेहराडूनमधून हृदय हेलावणारी बातमी समोर आली आहे. येथे चार तरुणांनी पती आणि मुलावर पिस्तूल रोखून महिलेचे अपहरण केले. त्यानंतर क्लोरोफॉर्मच्या मदतीने तिला बेशुद्ध केले आणि चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच घटनेनंतर आरोपींनी महिलेला घटनास्थळापासून दूर एका निर्जनस्थळी फेकून दिले. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दिली, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने तिने न्यायालयात धाव घेतली.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
आता न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर आतापर्यंत चारही आरोपी फरार आहेत. ही घटना 26 जुलै रोजी घडली, असे पीडितेने म्हटले आहे. त्या दिवशी ती पती आणि मुलासोबत बाजारात जाण्यासाठी बाहेर गेली होती. घरापासून हाकेच्या अंतरावरच एका कारमधून आलेल्या चार चोरट्यांनी पती आणि मुलाच्या कपाळावर पिस्तूल लावून तिचे अपहरण केले.
बेशुद्ध करुन केले दुष्कृत्य -
पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी तिला क्लोरोफॉर्म टाकून बेशुद्ध केले आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच घटनेनंतर आरोपीने तिला घटनास्थळापासून थोड्या अंतरावर एका निर्जन ठिकाणी अर्धनग्न अवस्थेत फेकून दिले. शुद्धीवर आल्यानंतर तिने प्रथम पतीला माहिती दिली आणि नंतर परत येऊन तक्रार केली. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला आणि आरोपी एकमेकांना आधीच ओळखत आहेत. काही काळापूर्वी पीडित महिला हरिद्वार येथील एका कंपनीत काम करत होती. तेथून ती मुख्य आरोपी उस्मानच्या संपर्कात होती. त्यादरम्यानही आरोपीने महिलेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता. यानंतर आरोपीने महिलेला पकडत आपला डाव साधला.
हेही वाचा - गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करणाऱ्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले, वाचा नंतर काय घडलं?
पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. यातील एकाही आरोपीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यांच्या अटक पोलीस पथके रवाना झाली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gang Rape, Rape news