मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /महिन्याला 5 हजार पगार घेणारा पालिकेचा माजी कर्मचारी झाला 238 कोटींचा मालक? काय आहे प्रकरण...

महिन्याला 5 हजार पगार घेणारा पालिकेचा माजी कर्मचारी झाला 238 कोटींचा मालक? काय आहे प्रकरण...

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

या कर्मचाऱ्याला महिन्याला अवघा 5 हजार रुपये इतका पगार होता.

आग्रा, 3 मार्च : आग्रा नगर निगमच्या (Agra Nagar Nigam) एका माजी आउटसोर्सिंग कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये पगार मिळत होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत तो 238 कोटींचा मालक झाला आहे. महिन्याला 5 हजार रुपये कमावणाऱ्या पालिकेच्या माजी संविदा कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. कर्मचाऱ्याच्या (Corruption case) विरोधात अनेकदा अधिकाऱ्यांनीही तक्रार केली आहे. मात्र कारवाईच्या फायली धुळीत कुठेतरीव कोपऱ्यात पडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सपोर्ट इंडिया सोसायटीचे अध्यक्ष आणि आग्राचे अधिवक्ता सुरेश चंद सोनी यांनी हा आरोप केला आहे. (Former employee of the Municipal Corporation who gets a salary of 5 thousand became the owner of 238 crores)

यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेचे माजी संविदा कर्मचारी राकेश वसंल सिकंदरामधील राधा नगर कॉलनीचे रहिवासी आहेत. ते साधारण 2008 मध्ये पालिकेच्या आऊटसोर्सिंग कर्मचारीच्या रुपात लागले होते. त्यांना महिन्याला पाच हजार रुपये पगार होता. जेव्हा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं तेव्हा त्यांचा पगार 19 हजार रुपये होता. मात्र पालिकेत काम करीत असताना राकेश बंसल यांनी आतापर्यंत कोट्यवधी संपत्ती मिळवली आहे.

आग्र्यासह अन्य जिल्ह्यातही संपत्ती...

अधिवक्ता सुरेश चंद सोनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये पालिकेचा आऊटसोर्सिंग कर्मचारी राकेश बंसल याच्या नावावर कोट्यवधी संपत्ती आहे. कर्मचाऱ्याविरोधात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र कारवाईच्या फाइलवर कोणीच पुढील चौकशी केली नाही. फाइली तशाच धूळ खात पडल्या आहेत. त्या कर्मचाऱ्याविरोधात कोणीही कारवाई करू नये अशी त्याने सेटिंग्ज केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे. आग्र्यासह शेजारी जिल्ह्यांमध्ये त्याची संपत्ती असून अनेक लग्जरी गाड्याही आहेत.

राकेश बंसल हे 2008 मध्ये पालिकेच्या आउटसोर्गिंगवर तैनात झाले होते. 2020 पर्यंत राकेश बंसल पालिकेच्या नगरायुक्तांच्या वैयक्तिक सहाय्यक पदावर होते, मात्र सातत्याने भ्रष्टाचाराचा आरोप लागल्यानंतर त्यांना पदावरुन काढून टाकण्यात आलं. यासोबतच राकेश बंसल याच्या भ्रष्टाचाराबाबत अनेकदा शासनापर्यंत तक्रारी करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा-2 मित्र एकमेकांच्या पत्नीच्या प्रेमात पडले, लग्नही केलं; मात्र एकाची आत्महत्या

आरोपीजवळ दहाहून अधिक फ्लॅट, नोएडामध्ये मॉल, तीन गाड्या, रायफल आणि अन्य संपत्ती आहे. सुरेश चंद सोनी यांनी सांगितलं की, राकेश बंसल याने पत्नी, आई, भाऊ यांच्यानावावर अनेक प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. त्याने आग्र्यात कोट्यवधींची जमिनदेखील खरेदी केली आहे.  राकेश बंसल याचे वडील चाटची गाडी चालवायचे. त्यात कशी बशी राकेशला पालिकेत नोकरी लागली. पार्किंग आणि जाहिरात आपल्या आवडत्या वा ओळखीच्या लोकांना देऊ लागले. यातून कमिशन ठरविण्यात आलं. यादरम्यान त्यांनी कोट्यवधी पैसे कमावले. इतकच नाही तर हॉटेल आणि रेस्टॉरंट संचालकांकडूनही अवैध वसुली केली. राकेश बंसल यांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना अनेकदा काढण्यात आलं, मात्र सेटिंग्ज लावून ती पुन्हा रुजू होत होते.

First published:
top videos

    Tags: Agra, Carr, Uttar pradesh