Home /News /crime /

सप्तपदीपूर्वीच तुरुंगवास; प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी तरुणी झाली खोटी BSF अधिकारी

सप्तपदीपूर्वीच तुरुंगवास; प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी तरुणी झाली खोटी BSF अधिकारी

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

सप्तपदी आधीच तरुणीला तुरुंगात राहण्याची वेळ आली आहे.

    मुंबई, 4 मार्च : प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असतं, अशी एक जुनी म्हण आहे. मात्र प्रेमात आकंठ बुडालेल्या 22 वर्षीय सनमती श्रिप्रेला मात्र याचा नेमका अर्थ कळाला नसावा. परिणामी तिला तुरुंगात जाण्याची वेळ आली. सनमती ग्वाल्हेरमधील (Madhya Pradesh News) एक बँक कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली होती. तिला कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी लग्न करायचं होतं. मात्र मुलाच्या कुटुंबाला अधिकारी पदावर असलेली सून हवी होती. यासाठी सनमतीने प्लान आखला आणि नको तो कारनामा केला. यामुळे तिच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सनमतीने BSF अकादमी टेकनपुरमध्ये असिस्टेंट कमांडेंटचा बनावटी जॉइनिंग लेटर घरीच तयार केला. प्रेमासाठी तिने उचललेलं पाऊल योग्य असल्याचं तिला वाटलं. सनमतीने विचार केला की, लग्नानंतर ती घरातील सदस्यांना सर्व खरं खरं सांगेन. मात्र प्रकरण तिच्यावरच उलटलं. लग्नाच्या पूर्वीच तिची होणारी सासरची मंडळी तिचं जॉउनिंग करून देण्यासाठी BSF अकादमीत घेऊन गेले. येथे तिचं भांडं फुटलं. अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावून तिला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली. सनमती महाराष्ट्रात राहणारी आहे. ग्वाल्हेरच्या एका बँक कर्मचाऱ्याच्या ती प्रेमात पडली. तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. मुलगा कोल्हापूरात नोकरी करतो, मात्र जेव्हा सनमतीला कळालं की, मुलाच्या कुटुंबाला अधिकारी सून हवी तर तिने आपलं प्रेम मिळवण्यासाठी खोटा प्लान केला. तिने इंटरनेटवरुन काही जुने जॉइनिंग लेटर काढले. त्यात फेरफार करून BSF अकादमी टेकनपूरमध्ये असिस्टेंड कमांडेटचं बनावटी जॉइनिंग लेटर घरीच तयार केलं. मात्र नशीबाला हे मान्य नव्हतं. सप्तपदी होण्यापूर्वीच सनमतीला तुरुंगात जावं लागलं. सनमती 21 फेब्रुवारी रोजी BSF अकादमी टेकनपुर (ग्वाल्हेर) मध्ये लेटर घेऊन असिस्टेंट कमांडेंटच्या ट्रेनिंगसाठी पोहोचली होती. अधिकाऱ्यांनी जॉइनिंग लेटर पाहून हैराण झाले. कारण लेटरवर डेप्युटी इंस्पेक्टर जनरल BSF डीके उपाध्याय यांची स्वाक्षरी होती. मात्र ते 2012 मध्येच रिटायर्ड झाले आहेत. या सर्व प्रकारानंतर BSF अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. सुरुवातीला तिने कोल्हापूरातून एका व्यक्तीने खोटं लेटर दिल्याचं सांगितलं. मात्र कोल्हापूरात नेमका व्यक्ती ती सांगू शकली नाही. शेवटी तिने आपला गुन्हा कबुल केला. हे ही वाचा-10 वर्षांचं प्रेम, लग्न मात्र 10 महिनेच टिकलं; दुसऱ्या लग्नासाठी घेतला घटस्फोट मुलाच्या बहिणीच्या लग्नामुळे प्लान बिनसला... सनमतीने पोलिसांना सांगितलं की, तिने फेब्रुवारीत जॉइनिंग लेटर तयार केलं होतं. लग्नानंतर मीच सर्वांना खरं सांगेन असा विचार तिने केला होता. मात्र यादरम्यान सासरच्या मंडळींनी नवीन अट ठेवली. मुलाच्या बहिणीचं लग्न आधी होणार असल्याचं त्यांनी ठरवलं. तोपर्यंत मुलाच्या कुटुंबाने आजूबाजूच्या लोकांना सूनेच्या जॉइनिंग लेटरबद्दल सांगितलं होतं.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BSF, Crime news, Kolhapur, Madhya pradesh, Online fraud

    पुढील बातम्या