मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /साताऱ्याच्या जेलमध्ये परदेशी तरुणांचा नग्न होऊन धिंगाणा, पोलिसांनाही केली मारहाण

साताऱ्याच्या जेलमध्ये परदेशी तरुणांचा नग्न होऊन धिंगाणा, पोलिसांनाही केली मारहाण

 वाई येथे रो हाऊसमधील कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्या प्रकरणी दोन परदेशी आरोपींना अटक करण्यात आली होती.

वाई येथे रो हाऊसमधील कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्या प्रकरणी दोन परदेशी आरोपींना अटक करण्यात आली होती.

वाई येथे रो हाऊसमधील कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्या प्रकरणी दोन परदेशी आरोपींना अटक करण्यात आली होती.

सातारा, 24 फेब्रुवारी : साताऱ्यातील जिल्हा कारागृहात (satara central jail) दोन परदेशी आरोपींनी विवस्त्र होऊन धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. एवढंच नाहीतर या आरोपींनी उपस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

साताऱ्यातील वाई येथे रो हाऊसमधील कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्या प्रकरणी दोन परदेशी आरोपींना अटक करण्यात आली होती. जर्मनी येथील सर्गीस व्हिक्‍टर मानका, सेबेस्टीन स्टेन मुलर असं या दोघांची नाव आहे.

या दोघांना सातारा जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले होते. मात्र, अचानक सर्गीस व्हिक्‍टर मानका आणि सेबेस्टीन स्टेन मुलर या दोघांनी कारागृहातच विवस्त्र होऊन धिंगाणा घातला. दोघांनी विवस्त्र होत कारागृहामधील स्वछतागृहाचे दरवाजे तोडले.

दोन्ही आरोपींनी धिंगाणा घालण्यास सुरुवात केल्यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली. उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी दोघांना आवरण्यासाठी धाव घेतली. पण धिंगाणा करण्यापासून रोखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे.

या प्रकरणी आता दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाला आहे. पण, याची तपशील अद्याप समोर येऊ शकली नाही.

कुत्रा चावल्याच्या रागातून तरुणाने कुत्र्याला जीवे मारले

डोंबिवलीमध्ये कुत्रा चावल्याच्या रागातून एका तरुणाने कुत्र्याला जीवे मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अजय याला अटक केली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड येथील मिनाताई उद्यानाची देखभालीचे काम गेल्या चार वर्षापासून अजय नायडू हे करीत आहेत. उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी शेरु नावाचा कुत्राही पाळला होता. उद्यान बंद केल्यानंतर नायडू हे शेरुला उद्यानात मोकळे सोडीत असत. 19 फेब्रुवारीला दुपारी 2.30 च्या सुमारास अजय मगरे हा दारू पिऊन गार्डनजवळ आला असता नायडू यांनी त्याला उद्यान बंद झाले असल्याचे सांगितले. परंतु, अजयने ते न ऐकता भिंतीवरुन उडी मारुन उद्यानाच्या आत गेला. त्याच वेळी  शेरुने अजयच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर रागाच्या भरात तरुणाने कुत्राला ठार मारले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Drug case, Drugs, India, Maharashtra, Police action, Satara