Home /News /crime /

Fish Lover नी लग्नात घातला राडा; एका माशाच्या तुकड्यासाठी मारहाण, 11 जणं जखमी

Fish Lover नी लग्नात घातला राडा; एका माशाच्या तुकड्यासाठी मारहाण, 11 जणं जखमी

तसं पाहता लग्न समारंभात छोटी-मोठी भांडणं होत असतात, मात्र माशाच्या तुकड्यासाठी या लग्नात तर राडाच झाला.

    बिहार, 12 जून : गोपाळगंज जिल्ह्याचील भोरे पोलीस ठाण्यातअंतर्गत एक विचित्र घटना समोर आली आहे. सर्वसाधारणपणे लग्न म्हटलं की थोडी फार तू तू मे मे होतंय. कोणाला काहीतरी कमी पडतं, तर आणखी काहीतरी कारणांनी रुसवे होत असतात. मात्र येथे झालेल्या प्रकारामुळे तब्बल 11 जणं जखमी झाले आहेत. येथे लग्न समारंभादरम्यान माशाच्या तुकड्यासाठी (माशाचे डोके) मोठी मारहाण झाली. या मारहाणीच्या घटनेत तब्बल 11 जणं जखमी झाले आहेत. ही घटना बिहारमधील गोपाळगंज जिल्ग्यातील भोरे पोलीस ठाणे हद्दीतील सिसई टोला भटवलिया येथे झाला आहे. (Fish Lover messed up the wedding beaten for a piece of fish 11 injured) हे ही वाचा-अंधश्रद्धेने घेतला 900 हून अधिक लोकांचा जीव, गावभर मृतदेहांचा पडला होता सडा येथे गुरुवारी रात्री जेवणादरम्यान माशाच्या डोक्याचा तुकडा वाढला नाही म्हणून मारहाण झाली.  या घटनेत दोन्ही पक्षातील 11 लोक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी भोरे रेफरल रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. या घटनेनंतर दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही पक्षातील जखमींचं जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तसं पाहता लग्न समारंभात छोटी-मोठी भांडणं होत असतात, मात्र माशाच्या तुकड्यासाठी या लग्नात तर राडाच झाला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Crime news

    पुढील बातम्या