जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / माजी सैनिकाचा मेव्हण्यावर गोळीबार, नंतर पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:ला घेतले घरात कोंडून

माजी सैनिकाचा मेव्हण्यावर गोळीबार, नंतर पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:ला घेतले घरात कोंडून

माजी सैनिकाचा मेव्हण्यावर गोळीबार, नंतर पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:ला घेतले घरात कोंडून

बहिणीला निरोप देण्यासाठी गेलेल्या तरुणावर त्याच्या माजी सैनिक (Ex-serviceman) भावोजीने गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवकावर गोळी झाडल्यानंतर (fire on brother in law) त्याने स्वत:ला पत्नी आणि दोन मुलांसह घरात कोंडून घेतले.

  • -MIN READ
  • Last Updated :

प्रयागराज, 3 मे: बहिणीला निरोप देण्यासाठी गेलेल्या तरुणावर त्याच्या माजी सैनिक (Ex-serviceman) भावोजीने गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवकावर गोळी झाडल्यानंतर (fire on brother in law) त्याने स्वत:ला पत्नी आणि दोन मुलांसह घरात कोंडून घेतले. तर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास प्रयागराज येथील नैनी ठाणे क्षेत्रातील कनैला गावात घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तर घराचे दार बंद होते आणि आरोपी माजी सैनिक हा घरात शस्त्र घेऊन फिरत होता. दार खोलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता गेट बंद असल्याचे दिसून आले. बराच आवाज करूनही रात्री उशिरापर्यंत गेट उघडले नाही. पोलिस गच्चीतून आत जाण्याचा प्रयत्न करत होते, पण तेही अपयशी ठरले. कनैला गावात या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. याठिकाणी उपविभागीय दंडाधिकारी माजी सैनिकाशी संवाद साधून दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करत आहेत. करछना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ककरम गावात राहणारे संजय शुक्ला हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. ते नैनी येथील कनैला गावात राहत आहेत. त्यांचे सासर करछनाच्या देवरी गाव येथे आहे. संजय शुक्ला आणि सासरच्या लोकांमध्ये काही कारणावरून भांडण सुरू आहे. संजयच्या बायकोचा भाऊ अभिषेक मिश्रा सोमवारी सायंकाळी पाच वाजता त्याच्या बहिणीला निरोप देण्यासाठी आला होता. मात्र, दरवाजा उघडताच संजय शुक्लाने त्याच्यावर गोळी झाडली. ही गोळी अभिषेकच्या हाताला लागली. त्यात तो जखमी झाला आणि जोराने ओरडत तिथून पळाला. त्याला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा -  माशा खातील म्हणून 18 वर्षीय प्रेयसीचा मृतदेह नाल्यात दिला फेकून, भाजप नेत्याने केला लव्ह जिहादचा आरोप आरोपी माजी सैनिकाचे काय म्हणणे आहे? आरोपी संजयचे म्हणणे आहे की, पैशासाठी संजयच्या पत्नीने आपल्या माहेरच्या लोकांची भेट घेऊन रात्री अनेकदा त्यांच्यावर हल्ला केला आहे. संजय जवळ हल्ला केल्याचा व्हिडीओ आणि ऑडीओ दोन्ही आहेत हे तो स्वीकार करतोय. मात्र, हा पुरावा तो फक्त जिल्हाधिकाऱ्यांना दाखवेल, असं सांगतोय. जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच पोलिसांनी बळजबरी केली तर तो कुणावरही गोळीबार करेल असा इशारा त्याने दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात