मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुण्यात मोबाईल घेण्याच्या शुल्लक कारणावरून गोळीबार; चार दिवसात दुसरी घटना

पुण्यात मोबाईल घेण्याच्या शुल्लक कारणावरून गोळीबार; चार दिवसात दुसरी घटना

पिंपरी चिंचवडमध्ये मोबाईल घेण्याच्या शुल्लक कारणावरून गोळीबार

पिंपरी चिंचवडमध्ये मोबाईल घेण्याच्या शुल्लक कारणावरून गोळीबार

गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहर हादरलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

पिंपरी चिंचवड, 6 डिसेंबर : पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अगदी शुल्लक कारणांवरुन इथं हाणामारीच्या घटना घडत आहे. अशाच एका घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरलं आहे. मोबाईल घेण्याच्या शुल्लक कारणावरून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवड शहरातील भाटनागर परीसरात ही घटना घडली आहे. या ठिकाणी मोबाईल घेण्याच्या शुल्लक कारणावरून हवेत गोळीबार करण्यात आला. हवेत 5 ते 6 राऊंड फायर केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अचानक गोळीबारचा आवाज झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वी असाच गोळीबार झाला होता. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आता तरी पोलीस कारवाई करणार का? अशा प्रश्न शहरवासीय उपस्थित करत आहेत.

वाचा - पुण्यात नग्णअवस्थेतील मनोरुग्णाला बेदम मारहाण, व्हायरल व्हिडिओने खळबळ

चार दिवसांपूर्वी एकाची हत्या

पिंपरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामनगर येथील परशुराम चौकात विशाल गायकवाड याचेवर काही अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. त्यानंतर कोयत्याने वार करत त्याचं शीर धडावेगळं करण्याचाही प्रयत्न केला. जुन्या वैमानस्यातून विशाल गायकवाड याचा प्रतिस्पर्धी टोळीतील आरोपींनी खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन डिसेंबरला ही घटना घडली होती.

काही महिन्यांपूर्वी गायकवाड टोळीवर मोक्काची कारवाई

काही महिन्यांपूर्वी विविध गुन्हे दाखल असलेल्या गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड यांच्या टोळीवर तिसऱ्यांदा मोक्काची (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999) कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या टोळीवर मोक्कांतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे. तर यापूर्वी या टोळीवर पुण्यात देखील मोक्काची कारवाई झाली आहे.

First published:

Tags: Gun firing, Pimpri chinchawad