मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुण्यात आर्थिक फसवणुकीचे प्रकार थांबेना, आणखी एका धक्कादायक प्रकाराने खळबळ

पुण्यात आर्थिक फसवणुकीचे प्रकार थांबेना, आणखी एका धक्कादायक प्रकाराने खळबळ

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पुण्यात आर्थिक फसवणुकीचे प्रकार थांबत नसल्याचे चित्र आहे. आता आणखी एका धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 5 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आर्थिक फसवणुकीचेही प्रकार समोर येत आहे. डेटिंग अॅप सर्व्हिसच्या माध्यमातून एका व्यक्तीला एक कोटींचा गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडलं -

रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी बनावट नियुक्तीपत्र देऊन सुमारे 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. रेल्वे मेल सर्व्हिस विभागाचे (आरएमएस) बनावट नियुक्तपत्र देऊन लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर याप्रकरणी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फिर्यादी आणि आरोपी ओळखीचे -

फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादीला पुणे रेल्वे स्टेशन येथील आरएमएसमध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. तसेच आणखी कोणी असेल तर त्यांनाही नोकरी देतो, असे सांगितले. त्यामुळे नोकरीच्या आमिषाने फिर्यादींनी नातेवाईक आणि इतरांना याबाबत सांगितले. हा प्रकार 15 डिसेबर 2022 ते 2 फेब्रुवारी 2023 दरम्यान घडला. या प्रकारात आरोपींनी फिर्यादीकडून 10 लाख 81 हजार रुपये उकळले. याबदल्यात त्यांना रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र दिले.

हेही वाचा - 'वर्ष बाकी आहे, दादांनी विचार करावा', फडणवीसांची मागणी अजित पवार मान्य करणार?

मात्र, हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. यावरुन बंड गार्डन पोलिस ठाण्यात भादंवि कलम 420, 465, 468, 471 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला केला असता आरोपी योगेश संतराम माने आणि नीलेश संतराम माने (दोघे रा. ताडीवाला रोड, पुणे) हे दुचाकीसह रेल्वे पार्सल गेटसमोर थांबले आहेत.

याचवेळी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून मध्य रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र, बँक चेकबुक, इतर बनावट कागदपत्रे आणि रोख 99,500 रुपये जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

First published:

Tags: Crime news, Money fraud, Pune