जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / क्षुल्लक कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, एक जण जागीच ठार तर 2 जखमी

क्षुल्लक कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, एक जण जागीच ठार तर 2 जखमी

क्षुल्लक कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, एक जण जागीच ठार तर 2 जखमी

यवतमाळ (Yawatmal) शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील पाटी पुरा परिसरात क्षुल्लक करणाहून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. (Fighting in two groups) यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

यवतमाळ, 9 मे : यवतमाळ (Yawatmal) शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील पाटी पुरा परिसरात क्षुल्लक कारणाहून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. (Fighting in two groups) यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर दोन जण जखमी आहेत. वैभव कृष्णराव नाईक, असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जखमी तरुणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री उशिरा घडली. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमकं काय घडलं? 30 एप्रिलला वैभव नाईक, नयन सौदागर, सुहास खैरकर हे पाटी पुरा परिसरात एका ठिकाणी बसले होते. यावेळी या तिघांचा आरोपीशी वाद झाला होता. त्यानंतर प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी या तिघांनाही जय भीम चौक येथे बोलवण्यात आले. त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केल. यात वैभव जागीच ठार झाला. तर नयन आणि सुहास पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावरही धारदार चाकूने हल्ला करण्यात आला. यात ते जखमी झाले. हेही वाचा -  एका कोंबड्याची हत्येनं पूर्ण शहराची झोप उडवली; आरोपी पोलीस अधिकारी निलंबित

9 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल - 

या घटनेत तक्रारीवरुन शुभम वासनिक, रत्नदीप पटाले, करण तिहले, अर्जुन तिहले, रोशन नाईक, प्रथम रोकडे, अभि कासारे व इतर आशा 9 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी तरुणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री उशिरा घडली. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात