जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO

बीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO

बीड लसीकरण केंद्रावर पोलीस आणि तरुणांमध्ये तुफान राडा; घटनेचा LIVE VIDEO

LIVE VIDEO: बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. ही घटने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 5 मे: बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात (Beed district hospital) लस घेण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तुफान राडा (youth fight with police) झाला आहे. पोलीस गर्दी पांगवत असताना तरुणांनी हुज्जत घातल्यामुळे पोलिसांनी त्यांची चांगलीच धुलाई केली आहे. पोलिसांनी मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral Video) होतं आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात बराच गोंधळ निर्माण झाला होता. तर वयोवृद्ध नागरिकांची धांदल उडाली होती. आज सकाळी बारा वाजता बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शिस्तीत रांगेत बसण्यास सांगितलं. यावेळी काही तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. तसेच काहींनी बीडचे उप पोलीस अधीक्षक संतोष वाळके यांना मारहाण देखील केली. या मारहाणीत संतोष वाळके यांच्या  मानेजवळ दुखापत झाली आहे. यानंतर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणांची चांगलीच धुलाई केली आहे. दरम्यान लसीकरण केंद्रावर उडालेल्या गोंधळामुळे लस घेण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध आणि महिलांची चांगलीच तारांबळ उडाली. एकीकडे लसीकरण सुरळीत करण्याचा प्रयत्न होत असताना, दुसरीकडे लसीकरण केंद्रावरील गोंधळ आणि मारहाणीमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला गेला. या प्रकरणात लसीकरण केंद्रावर गोंधळ घालणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ही वाचा- पोलिसांच्या गाडीवर जमावाकडून तुफान दगडफेक, नागरिकांचा संताप VIDEO मध्ये कैद सध्या बीड जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अडीच लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. मात्र अद्याप 45 वर्षांपुढील लोकांचं लसीकरण बाकी असताना, 18 वर्षापुढील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली आहे. अशातच तरुण लस मिळवण्यासाठी रांगा तोडण्याचाही प्रयत्न करत आहेत. दरम्यान बीड जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज सकाळपासून मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी नियंत्रीत करण्यासाठी पोलिसांनी सूचना दिल्या. मात्र सूचना देऊनही नागरिकांनी ऐकलं नाही. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात