जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Valentine’s Day दिवशीच प्रियकराचं वागणं लागलं जिव्हारी; तरुणीनं उचललं भयावह पाऊल

Valentine’s Day दिवशीच प्रियकराचं वागणं लागलं जिव्हारी; तरुणीनं उचललं भयावह पाऊल

Valentine’s Day दिवशीच प्रियकराचं वागणं लागलं जिव्हारी; तरुणीनं उचललं भयावह पाऊल

Crime News: दोन दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीनं आपल्या रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता हैराण करणारी माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुर्ग, 16 फेब्रुवारी: दोन दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीनं आपल्या रुममध्ये गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली होती. तिच्याच एका मैत्रिणीनं हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता हैराण करणारी बाब समोर आली आहे. संबंधित तरुणीनं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मैत्रिणीला फोन केला होता. व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine’s Day) दिवशी अनेकवेळा फोन करूनही प्रियकर भेटायला आला नसल्याची माहिती तरुणीने फोनवर दिली होती. त्यानंतर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे. Valentine’s Day प्रियकर भेटायला न आल्याच्या कारणातून तिने आपल्या राहत्या खोलीत आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथे घडली आहे. तर दिक्षा समुद्र रिसाली असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. ती मूळची दंतेवाडा जिल्हातील बचेली येथील रहिवासी होती. पण ती भिलाई येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तसेच येथेच पीजीमध्ये राहत होती. हेही वाचा- धक्कादायक! पुण्यात प्रसिद्ध बिल्डरकडून तरुणीवर बलात्कार;डेक्कन पोलिसांत FIR दाखल दरम्यान, व्हॅलेटाइन डेच्या दिवशी तिने आपल्या प्रियकराला भेटायला बोलावलं होतं. पण तिचा प्रियकर तिला भेटायला आला नाही. तिने अनेकदा विनवण्या केल्यानंतरही त्यानं भेटायला येण्याचं टाळलं. यामुळे अस्वस्थ झालेल्या मृत दिक्षाने आपल्या एका मैत्रिणीला फोन करून घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. मैत्रिणीनं दिक्षाची फोनवरून समजूत घातली. त्यानंतर काही वेळाने मैत्रिणीने पुन्हा दिक्षाला फोन केला. पण तिने फोन उचलला नाही. त्यामुळे मैत्रीण दिक्षाला भेटण्यासाठी तिच्या रूमवर आली. हेही वाचा- फोटो काढायला गेली अन् जाळ्यात अडकली, बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर दोघांकडून बलात्कार यावेळी दिक्षा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. हा प्रकार पाहताच दिक्षाच्या मैत्रिणीनं तातडीने या घटनेची माहिती नेवई पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, दिक्षाच्या मैत्रिणीचा जबाब नोंदवून घेतला आहे. तसेच घटनेची माहिती मृत तरुणीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस तरुणीच्या प्रियकराचा शोध घेत होते. या घटनेचा पुढील तपास नेवई पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात