• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • नराधम पित्याने केला 2 चिमुकल्या मुलींचा खून, चेहऱ्यावर उशी दाबून घेतले प्राण

नराधम पित्याने केला 2 चिमुकल्या मुलींचा खून, चेहऱ्यावर उशी दाबून घेतले प्राण

झोपेत असलेल्या दोन मुलींची (two daughters) दारूच्या नशेत (drunk) हत्या (murder) करणाऱ्या नराधम बापाला (Father) पोलिसांनी बेड्या ठोकल्या (arrested) आहेत.

 • Share this:
  लखनऊ, 16 ऑगस्ट : झोपेत असलेल्या दोन मुलींची (two daughters) दारूच्या नशेत (drunk) हत्या (murder) करणाऱ्या नराधम बापाला (Father) पोलिसांनी बेड्या ठोकल्या (arrested) आहेत. दारुच्या नशेत या बापानं गाढ झोपी गेलेल्या दोन लहान मुलींची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर घराबाहेर पडून गल्लीत आरडाओरडा करत खून केल्याची कबुली दिली. या घटनेने सर्वांनाच जबर धक्का बसला असून पोलिसांनी या नराधम बापाला अटक केली आहे. अशी घडली घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये राहणाऱ्या अरुण कुमारचं त्याच्या पत्नीशी कडाक्याचं भांडण झालं होतं. मुलगाच हवा, हा हट्ट असणाऱ्या अरुण कुमारला दोन मुली झाल्यामुळे त्याचा पत्नीवर राग होता. या वादातून दोघांची सतत भांडणं व्हायची आणि मारामाऱ्याही होत असत. पतीच्या जाचाला कंटाळून त्याची पत्नी मुलींना घेऊन माहेरी निघून गेली होती. त्यानंतर त्याने बायकोच्या माहेरी जाऊन गोंधळ घातला होता. तुला यायचं नसेल तर येऊ नको, असं सांगत मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी आपण घेऊ, असं सांगून तो मुलींना घरी घेऊन आला होता. त्यातील मोठी मुलगी सृष्टी 6 वर्षांची, तर छोटी मुलगी नैना 3 वर्षांची होती, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे. दारुच्या नशेत केला खून रात्री दारू पिऊन घरी आलेल्या अरुण कुमारनं मुलींना झोपवलं. त्यांना गाढ झोप लागल्यानंतर त्यांचा गळा दाबून आणि त्यांच्या चेहऱ्यावर उशी दाबून त्यांचा खून केला. शेजारीपाजारी आरडाओरडा करत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुलीदेखील दिली. या ठिकाणी बायको असती,तर तिचाही मला खून करायचा होता, असेही तो सर्वांना सांगत सुटला. काही वेळाने तो तिथून फरार झाला. हे वाचा - पोलीस कारवाई या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन मुलींचे मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला. आरोपी अरुण कुमारला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  Published by:desk news
  First published: