मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /घृणास्पद! पत्नी आणि मुलांसमोर सासऱ्याने सुनेवर केला बलात्कार; 8 वर्षे सुरू होता अत्याचार

घृणास्पद! पत्नी आणि मुलांसमोर सासऱ्याने सुनेवर केला बलात्कार; 8 वर्षे सुरू होता अत्याचार

गेली 8 वर्षे सासरा सूनेवर बलात्कार करीत होता, मात्र महिलेचा पती मूक गिळून पाहत राहिला...

गेली 8 वर्षे सासरा सूनेवर बलात्कार करीत होता, मात्र महिलेचा पती मूक गिळून पाहत राहिला...

गेली 8 वर्षे सासरा सूनेवर बलात्कार करीत होता, मात्र महिलेचा पती मूक गिळून पाहत राहिला...

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : दिल्लीतील (Delhi) गोकूळपुरी पोलीस ठाणे हद्दीतील एका भागातून अत्यंत धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. येथे एका सुनेने आपल्या सासऱ्या विरोधात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 वर्षांहून अधिक काळापासून सासरा तिच्यावर बलात्कार करीत होता.

जेव्हा या सर्व कृत्याची सुरुवात झाली त्यावेळी महिलेने आपल्या पतीला तिच्यासोबत होत असलेल्या अत्याचाराबद्दल सांगितलं होतं. मात्र पतीने उलट पत्नीलाच धमकी देऊन गप्प केलं. एकदा तर सासऱ्याने पत्नी आणि दोन्ही मुलांसमोर सुनेवर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणात महिलेचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे. महिलेने आपल्या तक्रारीत सासऱ्यावर बलात्कार, मारहाण, धमकी देणं आदी तक्रारी दाखल केल्या आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 27 वर्षीय गेल्या दीड महिन्यापासून गोकुळपूरी भागात आपल्या नातेवाईकांकडे राहत आहे. 2013 मध्ये तिचं लग्न उत्तर प्रदेशातील एका तरुणासोबत झालं होतं. लग्नाच्या दोन महिन्यांपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र यानंतर तिच्या पतीने तिला मारहाण सुरू केली. यादरम्यान महिलेचा गर्भपातदेखील झाला होता.

हे ही वाचा-दारू पार्टीमध्येच मित्राचा केला खून; अवघ्या 10 रुपयांमुळे सुरू झाला वाद आणि...

नशेचं औषध देऊन केलं बेशुद्ध...मग केला बलात्कार...

आरोप आहे की, एक महिन्यानंतर तिच्या सासऱ्याने नशेच्या औषधाचा वास देऊन तिला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेचे वकील विजय गोस्वामी यांनी सांगितलं की, आरोपीने आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर हे घृणास्पद कृत्य केलं. यानंतर तिचा पती दोन्ही मुलांना घेऊन गावी निघून गेला आणि त्यांना तिथच सोडलं. महिलेने या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 22 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

First published:

Tags: Crime, Rape