अखिलेश यादव, प्रतिनिधी चित्रकूट, 19 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी आपल्या मुलीवर गोळी झाडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील चित्रकूट येथे घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - मुलीला सासरच्या घरी नेण्याच्या हट्टामुळे संतप्त झालेल्या वडिलाने मुलीवर गोळ्या झाडली. ही घटना चित्रकूटच्या मऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरियारी कला गावातील आहे. तर यानंतर जखमी महिलेला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला प्रयागराज येथे रेफर केले आहे. दुसरीकडे पोलिसांनी आरोपी वडील याला अवैध पिस्तुलासह अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिमन्यू मिश्रा याची मुलगी मुस्कान हिचे 10 मे रोजी शंकरगड पोलीस स्टेशन हद्दीतील गावात लग्न होते. लग्नानंतर सासरचे लोक सुनेला घेऊन जाण्यासाठी आले. यादरम्यान त्यांनी मुलीच्या वडिलांकडे चारित्र्याबाबत तक्रार केली. मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने अभिमन्यू मिश्रा तिच्या सासरच्या लोकांवर रागावला आणि त्याने मुस्कानला तिच्या सासरच्या घरी पाठवण्यास नकार दिला. तर दुसरीकडे, सासरची मंडळी त्यांची सून मुस्कानला सासरच्या घरी घेऊन जाण्यावर ठाम होती. प्रकरण वाढत असल्याचे पाहून मुस्कानने वडिलांना शांत राहण्यास सांगितले आणि सासरी जाण्याबाबत सांगितले. हे ऐकून अभिमन्यू मिश्रा संतापला आणि त्याने खोलीत ठेवलेल्या अवैध पिस्तुलाने आपल्या मुलीवर गोळीबार केला. तिच्या कोपर आणि पोटात गोळी लागल्याने मुस्कान गंभीर जखमी झाली. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी वडील याला अवैध पिस्तूलसह अटक केली आहे. न्यायाधिकारी राजकमल यांनी सांगितले की, अभिमन्यू मिश्रा याने संतापून आपल्या मुलीवर गोळी झाडली ज्यामुळे ती जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच गोळीबार नेमका का करण्यात आला, याचा तपास केला जात आहे. मात्र, प्रथमदर्शनी मुलीच्या चारित्र्यावरुन वाद झाला, त्यावरून वडिलांनी मुलीवर गोळीबार केला, असे दिसत आहे. आत्तापर्यंत कुटुंबीयांकडून तक्रार देण्यात आलेला नाही. तक्रार मिळाल्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.