गाझियाबाद, 20 फेब्रुवारी : ऑनलाईन गुन्ह्यांचे (online fraud) चक्रावून टाकणारे प्रकारे सध्याच्या काळात समोर येत आहेत. दिल्लीमध्ये ऑनलाईन क्लासच्या (online class) नावावर असाच एक फसवणुकीचा प्रकार घडला आहे. गाझियाबादच्या एका प्रतिष्ठित फायनान्स कंपनीनं (finance company) ऑनलाईन क्लासच्या नावावर घेतलेल्या कागदपत्रांवर (documents for online class) चुकीच्या पद्धतीनं लोन (loan) मंजूर करून टाकलं. गाझियाबादमध्ये राहणारे दिलदार सिंह हे व्यवसायानं शेतकरी (farmer) आहेत. दिलदार सिंह यांच्या मते लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर एक्स्ट्रा मार्क्स एज्युकेशन (extra marks education) नावाच्या ऍपवरून (app) काही प्रश्न आले होते. मुलानं चार-पाचवेळा उत्तर पाठवल्यावर त्याला कंपनीकडून कॉल आला. या कॉल करणाऱ्या व्यक्तीनं म्हटलं, की तुमच्या मुलानं परीक्षा पास केली आहे. आता आम्ही कमी खर्चात चांगला अभ्यास करून घेणारी टेस्ट सिरीज (test series) त्याला देऊ. दोन दिवसात कंपनीचे लोक घरी आले. 35 हजार रुपयांपर्यंत फी देऊन बारावीपर्यंत ऑनलाईन शिका अशी ऑफर त्यांनी दिली. दिलदार सिंह यांनी यावर विश्वास ठेवत सुरुवातीला 5 हजार रुपये दिले. एका फॉर्मवर सहीपण केली. या लोकांनी बँक खात्यासह इतरही बरीच माहिती दिलदार यांच्याकडून घेतली. आधीच ते म्हणाले, की तुमच्या मुलाचा ट्रायल क्लास होईल. आणि तो आवडला नाही तर तुम्ही मध्येच बंदही करू शकता. हेही वाचा इन्स्टाग्रामवरही मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार; हे उपाय ठरतील फायदेशीर मुलाला खरोखरच ट्रायल क्लास न आवडल्यानं त्यानं ऑनलाईन क्लास करण्यास नकार दिला. आधी कंपनीसोबत थोडा वाद घालावा लागला नंतर मात्र या या लोकांनी बंद करण्याचं मान्य केलं. अनेक दिवसांनी दिलदार सिंह बँकेत गेले तेव्हा त्यांना कळालं, की दर महिन्याला त्यांच्या खात्यातून 2 हजार रुपये कमी होत आहेत. हा इएमआय बजाज फायनान्स कंपनीला (Bajaj Finance) जातो आहे. त्यांनी बजाज फायनान्समध्ये विचारणा केल्यावर समजलं, की दिलदार सिंह यांच्या नावावर 11 मार्चला 50 हजार आणि 13 मार्चला 30 हजार रुपये लोन घेतलेलं आहे. दिलदार सिंह यांच्या मते ही तारीख एक्स्ट्रा मार्क्स एज्युकेशन कंपनीला कागदपत्रं दिल्यावर चार दिवस नंतरची होती. दिलदार सिंह पोलिसात गेले. अनेक दिवस काहीच कारवाई झाली नाही. नंतर मात्र प्रकरण न्यायालयात गेलं. कोर्टानं एक्स्ट्रा मार्क्स एज्युकेशन कंपनीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. आता या कंपनीविरुद्ध गाझियाबाद इथल्या मसूरी ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.